dengue saam tv
लाईफस्टाईल

Mumbai News: मुंबईत पावसाळी आजारांचं थैमान; यंदाच्या वर्षी ४१ लोकांनी गमावला जीव

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाहीर केलीये. यावर्षी आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईत पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीही पावसामुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यातील आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाहीर केलीये. यामध्ये लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि हेपेटायटिसमुळे शहरात यावर्षी आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

सप्टेंबर महिन्यात पावसाळी आजारांचा कहर

सप्टेंबर महिन्यातही पावसाळ्यातील आजार जसं की, डेंग्यू, मलेरिया या आजारांनी थैमान घातलं होतं. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांची लागण झालेल्यांच्या संख्येत वाढ झालीये.

सप्टेंबर महिन्यात पावसाळ्यातील आजारांची आकडेवारी

ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीनुसार, 1171 जणांना मलेरिया आणि 1013 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर सप्टेंबर महिन्यामध्ये या आकडेवारीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. सप्टेंबर महिन्यात 1261 जणांना मलेरियाची लागण झाली आहे तर 1456 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे.

या वर्षी 18 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी डेंग्यूमुळे 12, स्वाइन फ्लूमुळे 5, मलेरियामुळे 5 आणि दूषित पाणी प्यायल्याने होणाऱ्या हिपॅटायटीसमुळे 1 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या लेप्टोमुळे एकूण 18 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्याचवेळी डेंग्यूमुळे 12, स्वाइन फ्लूमुळे 5, मलेरियामुळे 5 आणि हेपेटायटिसमुळे 1 जणाचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात काही आजारांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याचंही दिसून आलं आहे. यामध्ये चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, हिपॅटायटीस आणि गॅस्ट्रोचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात चिकनगुनियाचे 164, लेप्टोचे 272, गॅस्ट्रोचे 649, हेपेटायटिसचे 169 आणि स्वाइन फ्लूचे 169 रुग्ण आढळून आले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात चिकुनगुनियाचे 156, लेप्टोचे 75, गॅस्ट्रोचे 466, हेपेटायटिसचे 129 आणि स्वाईन फ्लूचे 62 रुग्ण आढळून आलेत.

अचानक येणाऱ्या पावसाने डासांमध्ये वाढ

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी सांगितलं की, मुंबईत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचण्याची समस्या जाणवते. या पाण्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाची पैदास होते. अशावेळी नागरिकांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT