mobile hacking signs google
लाईफस्टाईल

Phone Hacking Signs: स्मार्टफोनद्वारे कुणी तुमच्यावर नजर तर ठेवत नाही ना? या स्टेप फॉलो करून आताच करा चेक

Mobile Security: आजच्या काळात मोबाईल हॅकिंगचा धोका वाढला आहे. बॅटरी लवकर संपणे, डेटा जास्त वापर आणि फोन गरम होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका, अन्यथा गोपनीय माहिती धोक्यात येऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्याला घरी थांबायला वेळ मिळत नाही. अनेकांच्या घरात त्यांचं कुटुंब असतं. त्यामध्ये आई-वडील, लहान-मुलं, बहीण-भाऊ असतात. मग त्यांच्याशी दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्मार्टफोनने आपण व्हिडीओ कॉल करतो किंवा साधा कॉल करतो. पण वाढत्या सायबर क्राइममुळे मोबाईल वापरणं जरा जास्त जोखमीचं झालंय असं वाटतं.

कारण हाच मोबाईल तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकतो. यात फक्त तुमचं लोकेशन नाहीतर, तुमचं फोनवर झालेलं बोलणं, मेसेज यांचाही समावेश होऊ शकतो. पण हे कसं ओळखायचं? हे पुढील बातमीत समजून घ्या.

बॅटरीत होणारे बदल

सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या बॅटरीत बदल जाणवू शकतो. बऱ्याचदा फोन खूप जूना झाला असेल तर तुमची बॅटरी व्यवस्थित काम करत नाही. चार्जिंग कमी जास्त होते. पण जर अचानक ब‌ॅटरी कमी होत असेल तर हा धोक्याचा इशारा आहे.

इंटरनेट संपण्याची कारणे

जेव्हा तुम्ही मोबाईलचे इंटरनेट जास्त वापरत नाही. तरीही तुमचं नेट संपतं हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा सावध व्हा. स्पायवेअर आणि इतर अॅप्सच्या सारख्या वापरामुळे सुद्धा इंटरनेटवर वापरलं जाऊ शकतं.

फोन जास्त गरम होणे.

उन्हाळ्यात अनेकांचे फोन गरम होतात. पण याचं तापमान जास्त वाढत असेल तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा कॅमेरा आणि इतर घटकांटचा गुप्तपणे वापर केल्यामुळे फोन गरम होऊ शकतो. त्यामुळे फोनमधले तुम्हाला नको असलेले Apps डिलीट करुन टाकणं हा योग्य पर्याय ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mugache Dose: सकाळचा नाश्ता करुनही लगेच भूक लागतेय? मग मुगाचे जाळीदार डोसे ठरतील बेस्ट

Maharashtra News Live Update: सोलापूर महापालिकेतील विशेष सभेत पुन्हा पाहायला मिळाला गदारोळ

Vaidehi Parshurami: नको करु सखी असा साजिरा श्रृंगार...; वैदेहीचं मनमोहक सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Kolhapur : दुर्दैवी! रस्त्याने जाताना अंगावर भिंत कोसळली, प्राध्यापिका अन् शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू

Actor Instagram Hacked: प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं अकाऊंट हॅक; आठवड्याभरात चाहत्यांची आर्थिक फसवणूक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT