Mobile Hang Saam Tv
लाईफस्टाईल

मोबाईल सतत हँग होतोय? या सोप्या पद्धतीने स्टोरेज करा कमी...

स्मार्टफोनमध्ये सर्व फाईल्स आणि अॅप्स असणे आवश्यक आहे. असे काही ऍप्स असतात जे आपन डिलीट करत नाही. परंतु तरीही तुम्ही काही सोप्या टिप्सने काही अतिरिक्त मेमरी मेमरी मिळवू शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाजारात भरपूर स्टोरेज स्पेस असलेले स्मार्टफोनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु जर तुमच्या डिव्हाइसची स्टोरेज स्पेस 64 GB किंवा 32 GB पेक्षा कमी असेल, तर एखादा भारी गेम किंवा मोठ्या फाइल डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला नोटिफिकेशन बारमध्ये 'Out of storage' असा मेसेज दिसू लागतो. Android स्मार्टफोन्सची चांगली गोष्ट म्हणजे यात IPhone पेक्षा बरेच पर्याय मिळतात. पण त्यांच्यात थोडीशी त्रासदायक गोष्ट अशी आहे की हळूहळू त्यांची अंतर्गत मेमरी (Internal Storage) भरत राहते. तुम्ही काही सोप्या मार्गांनी अंतर्गत स्टोरेज मोकळे करून फोनचा परफॉर्मन्स सुधारू शकता. (How To Clear Internal Storage)

स्मार्टफोनमध्ये सर्व फाईल्स आणि अॅप्स असणे आवश्यक आहे. असे काही ऍप्स असतात जे आपन डिलीट करत नाही. परंतु तरीही तुम्ही काही सोप्या टिप्सने काही अतिरिक्त मेमरी मेमरी मिळवू शकता.

तुमच्या स्मार्टफोनमधील स्टोरेज कसे कमी करावे?

  1. तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा

  2. स्टोरेज निवडा

  3. तुम्हाला फाइल श्रेणींची यादी दिसेल आणि किती जागा शिल्लक आहे

  4. 'फ्री अप स्पेस' पर्यायावर क्लिक करा

  5. तुम्हाला Google Files अॅप (इंस्टॉल केलेले असल्यास) किंवा 'रिमूव्ह आयटम्स' निवडण्याचा पर्याय मिळेल.

  6. रिमूव्ह आयटम पर्याय तुम्हाला तुम्ही बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ हटवण्याचा पर्याय देते.

  7. याव्यतिरिक्त, तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइल्स आणि कमी वापरलेले अॅप्स देखील काढू शकता.

हे देखील पहा-

कॅशे मेमरी साफ करा;

फोनची बहुतेक मेमरी कॅशेमध्ये जाते, म्हणून प्रथम ती क्लीअर करा. सेटिंग्ज वर जा आणि स्टोरेज वर जा. येथे तुम्हाला कॅशे दिसेल. ते क्लिअर करा. काळजी करू नका, हे डिलीट केल्याने तुमच्या कोणत्याही फाइल्स डिलीट होणार नाही.

अनावश्यक अॅप्स अनइंस्टॉल करा;
तुम्ही अँड्रॉइड प्लेस्टोअरवरून अनेक अॅप्स डाउनलोड करू शकता. पण असे अनेक अॅप्स आहेत जे आपण इन्स्टॉल करतो पण नंतर वापरत नाही. फक्त तुम्ही वापरत नसलेले अॅप्स अनइंस्टॉल करा. यासाठी सेटिंग्जमधील अॅप्सच्या आत जाऊन ते डिलीट करा किंवा अॅप ड्रॉवरमध्ये जाऊन आयकॉनला स्पर्श करून धरून ठेवा. हे तुम्हाला अनइंस्टॉल अॅप असा पर्याय दर्शवेल.

इमेजची साईझ कमी करा;
आपण काढलेले सर्व फोटो फोनमध्येच ठेवावेत असे नाही. Google Photos किंवा इतर क्लाउड स्टोरेज अॅप्सद्वारे त्यांचा ऑनलाइन बॅकअप घ्या. त्यानंतर त्यांना फोनमधून डिलीट करा. यामुळे तुम्ही बरीच स्पेस मोकळी करू शकता. याशिवाय फोटो आणि पिक्चर रिसाइजर अॅप डाउनलोड करून तुम्ही फोटोंची साईझ बदलू शकता. हे तुमच्या स्टोरेजमध्ये कमी जागा घेईल. त्याचवेळी पूर्ण रिझोल्यूशन इमेजचा बॅकअप घेण्यास विसरू नका.

डाउनलोड्स डिलीट करा;
सेटिंग्ज मध्ये डाउनलोड वर जा. जर तुम्ही एखादी मोठी फाईल डाउनलोड केली असेल तर ती डिलीट करा. वेळोवेळी डाउनलोड्स क्लिअर करत राहा, कारण काही वेळा अशा फाइल्स त्यात पडून असतात, ज्या उपयोगी पडत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

Raj Thackeray : पुढच्या २-४ महिन्यात देशात काहीतरी मोठी घडामोड घडणार, राज ठाकरेंचा दावा, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update:२ ते ५ महिन्यात देशात मोठी गडबड होईल - राज ठाकरे

नव्या विहिरीसाठी सरकार देतंय ४ लाखांचं अनुदान, दुरुस्तीसाठी मिळतंय अर्थसहाय्य, कुठे कराल अर्ज?

Virtual Metro Smart Card : स्मार्टफोनच बनणार तुमचं मेट्रो कार्ड, खिशात कार्ड नसतानाही करा क्यूआर कोडद्वारे प्रवास; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT