mobile screen effects on children google
लाईफस्टाईल

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Screen Time Effects: सध्या लहान मुलांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. त्यामुळे त्यांना कमी वयातच डोळ्यांच्या आजाराला सामोरं जावं लागतं.

Sakshi Sunil Jadhav

प्रत्येकाचा घरात लहान मुलं त्रास दयायला लागले की लगेच पालक मोबाईल देऊन चूप करतात. ही बातमी त्या प्रत्येक पालकांसाठी जे असे काही कृतीं करतात. कारण बालपण हरवत चाललं आहे.. यात खेळणारी मुलं स्क्रीन आणि मोबाईलचे आहारी गेले आणि हेच डोळ्याचा आजराससाठी धोकादायक ठरत असल्याचं मेडिकल कॉलेजचे नेत्ररोग तज्ञ यांचा संशोधनात समोर आले आहे.. मागील दोन वर्षात शेकडो मुलांचा तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याच डॉ. पियुष मदान सांगतात.

मोबाईल, टॅब आणि डिजिटल स्क्रीनचा वाढता वापर आता थेट मुलांच्या डोळ्यांवर परिणाम करत असल्याचं गंभीर चित्र समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सतत स्क्रीनसमोर राहिल्याने डोळ्यांचा ब्लिंकिंग रेट म्हणजेच पापण्यांची उघडझाप कमी होत असून, त्यामुळे डोळ्यांना लवकर थकवा येणे, कोरडेपणा, डोळे जळजळणे आणि दृष्टी कमजोर होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पूर्वी 10 ते 30 वयोगटात दिसणाऱ्या डोळ्यांच्या समस्या आता लहान मुलांमध्ये दिसू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, पाचवी-सहावीत लागणारा मायनस नंबरचा चष्मा आता अगदी प्राथमिक वर्गातील मुलांनाही लागू लागल्याचं डॉक्टर सांगत आहेत.

सध्या मुलांचा तब्बल 66 टक्के वेळ डिजिटल उपकरणांवर जात असल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. मोबाईल आणि टॅबमधून निघणाऱ्या हानीकारक ब्लू लाईटमुळे झोपेच्या चक्रावर परिणाम होत आहे. मुलांना वेळेवर झोप लागत नाही, ते उशिरापर्यंत जागे राहतात, परिणामी चिडचिड, तिरसटपणा आणि मानसिक अस्वस्थता वाढत असल्याचंही तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचा परिणाम टीव्हीपेक्षा अधिक धोकादायक आहे. कारण मोबाईल स्क्रीन डोळ्यांच्या अत्यंत जवळ वापरली जाते. त्यामुळे डोळ्यांवर ताण अधिक वाढतो.

अमेरिकेतील अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सनेही याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. कोविडनंतर लहान मुलांना मोबाईलवर व्हिडीओ दाखवत जेवण घालण्याची सवय मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, 0 ते 2 वर्षांच्या मुलांना स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांना दिवसातून केवळ 1 तास स्क्रीन टाइम द्यावा, असंही सांगण्यात आलं आहे.

डिजिटल स्क्रीन वापरताना प्रत्येक 30 मिनिटांनी किमान 20 सेकंदांचा ब्रेक घेणे आवश्यक असल्याचा सल्लाही डॉक्टर देतात. अन्यथा येत्या काळात लहान वयातच डोळ्यांचे गंभीर आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT