Sakshi Sunil Jadhav
तुम्ही जर गावी गेला असाल तर उन्हाच्या दिवसात तुम्हाला विंचू फिरताना दिसलेच असतील.
विंचू खूप विषारी असतात. त्यांनी डंक मारला की, त्याचं विष हळूहळू पूर्ण शरीरात पसरतं.
सध्या अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, विंचू चावल्यावर त्याचं विष शरीरात किती वेळ टिकतं?
मुळाच विंचवाचं विष त्याच्या प्रजातीवर आणि आकारावर अवलंबून असतं. पण याची किंमत खूप जास्त असते.
विंचू चावल्यानंतर त्यांचं विष हे शरीरात २४ ते ७२ तासांपर्यंत राहू शकतं.
जेव्हा विंचू चावतो तेव्हा अचानक वेदना, जळजळ, सुज किंवा मुंग्या येतात.
काही विषारी विंचू चावल्यावर ह्रदय, फुफ्फुस किंवा मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि लक्षणे अनेक दिवस टिकू शकतात. Scorpion Sting Symptoms
विंचू चावल्यावर सर्वप्रथम दंशाचा भाग साबणाने धुवा. मग तिथे थंड पाण्याचा शेक द्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताच उपाय करू नका.