Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या खाण्यापिण्याच्या वेळेत आणि पदार्थात बदल झाल्यामुळे फॅट वाढत चालला आहे.
फक्त फॅट नाहीतर काही खाल्लं की अॅसिडीटीचाही त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही नाश्ता करणं म्हणजे पोहेही खाणं टाळता.
पुढील रेसिपीत तुम्ही तेलाचा वापर न करता आणि अॅसिडीटी न होणारे पोह्याची रेसिपी पाहणार आहोत.
१ कप पातळ पोहे, १ बारीक चिरलेला कांदा, १ छोटा टोमॅटो, १ हिरवी मिरची, थोडी हिरवी कोथिंबीर, १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, मीठ, १ लिंबाचा रस, शेंगदाणे इ.
सर्वप्रथम पोहे धुवून मऊ होण्यासाठी ५ मिनिटं चाळणीत ठेवा.
पोहे भिजत घातल्यावर, त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. सर्व साहित्य मिक्स करून घ्या.
पुढे त्यात मीठ, जीरं आणि लिंबाचा रस मिक्स घालून मिक्स करून घ्या.
आता वरून शेंगदाणे मोड आलेले मुग किंवा डाळींबाचे दाणे मिक्स करून तुम्ही पोहे सर्व्ह करा.