Thursday remedy for marriage problems saam tv
लाईफस्टाईल

Guruvar Upay: गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मिसळा 'या' दोन गोष्टी; लग्नासंबंधी समस्या होतील लगेच दूर

Thursday remedy for marriage problems: हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि बृहस्पती देव (गुरु) यांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह हा विवाह, ज्ञान आणि समृद्धीचा कारक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • आंघोळ ही शारीरिक आणि मानसिक शुद्धतेची गोष्ट आहे.

  • गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद-चंदन मिसळणे शुभ मानले जाते.

  • गुरुवार हा बृहस्पति ग्रहाचा दिवस आहे.

आंघोळ ही आपल्या रोजच्या दिनक्रमातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आंघोळीमुळे केवळ शरीरच नाही तर मन देखील प्रसन्न होतं. आंघोळीमुळे शरीरातील घाण, थकवा आणि निगेटिव्ह ऊर्जा दूर होते. अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. मात्र ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, याच आंघोळीच्या पाण्यात विशिष्ट वस्तू घातल्या तर ती केवळ शारीरिक शुद्धतेपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा प्रभाव आपल्या ग्रहदोषांवरही होतो.

ज्योतिषानुसार विशेष गोष्टी आंघोळीच्या पाण्यात मिसळा

ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या प्रत्येक दिवशी पाण्यात विशिष्ट वस्तू मिसळल्यास संबंधित ग्रह बळकट होण्यास मदत होते. गुरुवारी ज्यावेळी आपण आंघोळीच्या पाण्यात योग्य गोष्टी मिसळतो, तेव्हा गुरु ग्रहाचे दोष कमी होतात आणि त्याचा चांगला परिणाम आर्थिक, वैवाहिक आणि आरोग्यदृष्ट्या होतो.

गुरुवारचे संबंधित ग्रह - बृहस्पति (गुरु)

गुरुवार हा बृहस्पति ग्रहाशी संबंधित असतो. जर हा ग्रह कमकुवत असेल, तर पैशांची चणचण, आरोग्याच्या समस्या आणि लग्नात अडथळे असे त्रास सुरू होतात. त्यामुळे या ग्रहाचे संतुलन साधणे खूप आवश्यक असते.

गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात 'या' गोष्टी मिसळा

जर गुरुवारी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हळद आणि चंदन मिसळाल तर तुमचे गुरुग्रह मजबूत होऊ शकतात. यामुळे घरात धनधान्याचे येण्यास मदत होते. शिवाय आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात, आरोग्य सुधारेल आणि लग्नात येणारे अडथळे कमी होण्यास मदत होते.

गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी इतर उपाय

गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करणं, व्रत ठेवणं हेही अत्यंत फलदायी मानण्यात येतं. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणं शुभ असतं. त्याचप्रमाणे चणाडाळ, हळद, पिवळ्या रंगाचे कपडे आणि फळांचे दान करणं गुरु बळकट करण्यासाठी खूप उपयोगी असतं.

गुरुवारचा दिवस कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे?

गुरुवार हा बृहस्पति (गुरु) ग्रहाशी संबंधित आहे. गुरु ग्रहाचे संतुलन आर्थिक, आरोग्य आणि वैवाहिक समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे.

गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळाव्यात?

गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद आणि चंदन मिसळावे. यामुळे गुरु ग्रह बळकट होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

गुरु ग्रह कमकुवत असल्यास कोणते त्रास होऊ शकतात?

गुरु कमकुवत असल्यास पैशाची चणचण, आरोग्याच्या समस्या आणि लग्नात अडथळे येऊ शकतात.

गुरुवारी कोणते व्रत आणि पूजा फायदेशीर आहे?

गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करणे आणि व्रत ठेवणे गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते.

गुरु ग्रह बळकट करण्यासाठी कोणते दान करावे?

चणाडाळ, हळद, पिवळ्या रंगाचे कपडे आणि फळे यांचे दान करणे गुरु ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT