Mirchi Bhaji Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Mirchi Bhaji Recipe : अस्सल कोल्हापूरी मिरची! बाहेरून कुरकुरीत आतून मऊ; 'या' टिप्सने बनवा चटकदार रेसिपी

Recipe : घरच्याघरी अस्सल कोल्हापूरी स्टाइल मिरची भजी कशी बनवतात? याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

प्रत्येकाच्या जीभेची चव वेगवेगळी असते. काही व्यक्तींना तिखट पदार्थ फार आवडतात तर काहींना गोड पदार्थ फार आवडतात. तसेच काहींना आंबट पदार्थ सुद्धा आवडतात. काही व्यक्ती अशाही असतात ज्यांना झणझणीत लवंगी मिरची आणि त्यापासून बनवलेली भजी खावीशी वाटतात. ही भजी घरच्याघरी कशी बनवावीत याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

हिरवी मिरची

बेसन पीठ - २ वाटी

हळद - १ चमचा

मीठ - चवीनुसार

जीरे - २ चमचे

ओवा

पाणी

तेल

कृती

सर्वात आधी हिरव्या मिरच्या पाण्यात मस्त धुवून घ्या. मिरची धुवून झाल्यावर ती एका सुती कापडाने पुसून घ्या. त्यानंतर या मिरचीवर मध्यभागी चिरा पाडून घ्या. त्यानंतर त्यात अगदी चिमुटभर मीठ भरा. अशा पद्धतीने मिरचीत मीठ भरून ती एका बाजूला ठेवा. त्यानंतर तुम्हाला भजी बनवण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण बनवून घ्यावं लागेल.

बेसन पिठाचं मिश्रण बनवताना सर्वात आधी एका वाटीत बेसन पीठ घ्या. त्यामध्ये जीरे आणि ओवा मिक्स करा. जिरे आणि ओवा मिक्स केल्यावर यात थोडं थोडं पाणी मिक्स करून याचं घट्ट आणि पातळ असं मिश्रण तयार करा. त्यानंतर यामध्ये चविनुसार मीठ, हळद मिक्स करा. तसेच शेवटी या मिश्रणात थोडा खाण्याचा सोडा मिक्स करा. अशा पद्धतीने तयार झालं तुमचं बॅटर.

आता पुढे भजी तळताना सर्वात आधी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होत असताना त्यात एक एक करून मिरची पिठात बुडवून घ्या. मिरची पिठात बुडवून तळून घ्या. मिरची तळत असताना गॅस लगेचच फास्ट करू नका. असे केल्याने पीठ जळून जाते आणि मिरची आतून कच्ची राहते. त्यामुळे मिरचीचे भजी तळताना ते मीडिअम टू लो फ्लेमवर तळून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT