Siddhi Hande
पावभाजी हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
पावभाजी बनवण्यासाठी बटाटे, फ्लॉवर, टॉमेटो, शिमला मिरची या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्या.
कुकरच्या २-३ शिट्ट्यांमध्ये भाज्या चांगल्या शिजतील.
त्यानंतर तुम्ही भाजी मॅश करुन घ्या. मिक्सरमध्येही तुम्ही भाजी बारीक करु शकतात.
यानंतर तुम्ही कढईत तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, मिरची पावडर आणि पावभाजी मसाला टाका.
यानंतर सर्व मसाले मस्त परतून घ्या. त्यात थोडं पाणी टाका.
यानंतर मसाल्याला तेल सुटल्यावर बारीक केलेली भाजी टाका. यानंतर त्यात थोडं पाणी टाका.
ही भाजी जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका. भाजीवर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.