Siddhi Hande
बटाटा भजी खायला सर्वांनाच आवडते. भजी आणि वाफाळलेला चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते.
बटाटा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याचे पातळ काप करुन घ्या.
त्यानंतर एका भांड्यात बेसन पीठ, हिरवी मिरची, लाल-तिखट आणि ओवा टाका. चवीनुसार मीठदेखील टाका.
यानंतर त्यात पाणी टाकून चांगल मिश्रण तयार करा. हे मिश्रण जास्त पातळ होऊ देऊ नका.
यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर बटाट्याचे काप बेसनात टाकून तळून घ्या.
हे भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर तुम्ही हे भजी हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात.