milkshake brain health saam tv
लाईफस्टाईल

Brain Health : मिल्कशेक आणि जंक फूड खाताय? मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, जाणून घ्या धक्कादायक रिपोर्ट

Milkshake Study : नवीन संशोधनानुसार मिल्कशेकसारखे हाय फॅटी पदार्थ मेंदूतील रक्तप्रवाह कमी करतात. त्यामुळे स्ट्रोक, डिमेंशिया यांचा धोका वाढतो. संतुलित आहार घेणेच आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये लोक हेल्दी पदार्थ सेवन करण्याला जास्त प्राधान्य देत आहेत. त्यामध्ये दुधाच्या पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच दुधाचे सेवन रोजच्या आहारातसोबत घेत असतात. तुम्हाला माहितीये का? जितके आपण जंक फूड खातो तितका आपल्या मेंदूवर खूप घातक परिणाम होत असतो.

जे लोक आठवड्याभर डाएट करतात आणि एक दिवस चीट डे म्हणून इतर पदार्थ सेवन करतात. त्यांच्या मेंदूवर हा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही कोणतेही पदार्थ खाताना दोनदा विचार केला पाहिजे. कारण आहार तज्त्रांच्या अभ्यासात असे आढळले आहे की, काही दिवस हाय प्रोटीनचे पदार्थ जसे मिल्कशेक सेवन केल्याने मेंदूकडे पोहोचणारा रक्तप्रवाह प्रभावित होतो. त्याने स्ट्रोक आणि डिमेंशिया असे आजार तुम्हाला होऊ शकतात.

तुम्हाला माहिती असेल शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी शरीरात फॅट असणे गरजेचे आहे. फॅट शरीराच्या संरचनात्मक भागांना तयार करण्यासाठी मदत करते. फॅटी विरघळणारे जीवनसत्वे वाहून नेते आणि शारीरिक विकासासोबत अनेक महत्वाच्या जैविक कार्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. फॅटचे दोन प्रकार असतात. त्यामळे पहिले सॅच्युरेटेड फॅट आणि दुसरा अनसॅच्युरेडेट फॅट. यांचे केमिकल कंपोजिशन वेगवेगळे असते. तसेच शरीरावर याचा प्रभाव सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो.

तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, मिल्कशेक किंवा तळलेले अन्न पदार्थ लगेचच शरीरावर परिणाम दाखवायला सुरुवात करतात. या संशोधनात पुरुषांच्या दोन गटांचा अभ्यास करण्यात आला आहे. एक गट १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचा आणि दुसरा ६० ते ८० वयोगटातील व्यक्तींचा असेल. त्यांना जास्त फॅटी पदार्थ देण्यात आले. या संशोधनात पुरुषांच्या दोन गटांचा अभ्यास करण्यात आला.

एक गट १८-३५ वयोगटातील आणि दुसरा गट ६०-८० वयोगटातील. त्यांना जास्त फॅटी पदार्थ देण्यात आले. त्यामध्ये मिल्क शेकचा समावेश जास्त होता. पुढे रिजल्टमध्ये या सर्व वयोगटातील हाय-फॅट आहारामुळे रक्तवाहिन्यांची क्षमता कमी होते व मेंदूपर्यंत रक्तपुरवठा घटतो. तसेच वृद्धांमध्ये याचा परिणाम 10% अधिक दिसतो. संतुलित आहार घेणे आरोग्यास उपयुक्त ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT