Michael Clarke Skin Cancer  saam tv
लाईफस्टाईल

Skin Cancer : उन्हामुळे होतो स्कीन कॅन्सर! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लार्कची शस्त्रक्रिया

Michael Clarke Skin Cancer : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क त्वचेच्या कॅन्सरमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. नाकावर सहावी शस्त्रक्रिया झाल्याचे त्याने जाहीर केले. सूर्यकिरणांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार मायकेल क्लार्क एका गंभीर आजारामुळे चर्चेत आला आहे. खरं तर त्याच्या त्वचेच्या कर्करोगामुळे त्याच्या नाकावर सहावी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. क्लार्कने २९ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली की, ''ऑस्ट्रेलियामध्ये त्वचेच्या कर्करोग हा सामान्य आजार आहे. मी स्वतः अनेकदा या आजाराला सामोरे गेलो आहे.'' २००६ मध्ये पहिल्यांदा त्याला या आजाराची लागण झाली आणि पुन्हा एकदा नाकातून गाठ काढण्यात आली आहे. क्रिकेटपटू म्हणून तासनतास उन्हात खेळल्यामुळेच हा आजार झाला असल्याचे त्याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ऊन खूप तीव्र असल्यामुळे त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त वाढले आहे. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेतील पेशींमध्ये होणारे बदल. गोरी त्वचा, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.

त्वचेच्या कर्करोगाचे तीन प्रकार आहेत.

१. बेसल सेल कार्सिनोमा

२. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा

३. सर्वात धोकादायक मेलेनोमा.

यामध्ये क्लार्कला नॉन-मेलेनोमा प्रकार असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांच्या मते, जर त्वचेवर नवीन गाठ, डाग किंवा जखम बरी न होणे यासारखी लक्षणं दिसली तर त्वरित तपासणी करावी. योग्य वेळी निदान झाल्यास ९५ टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची नियमित तपासणी आणि उन्हात स्वतःचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Corn Silk Tea : मक्याच्या केसांचा चहा कधी प्यायलात का? किडनीपासून शुगरपर्यंत आजार होतील दूर

Pune University: पुणे विद्यापीठाचा बोगस डिग्री घोटाळा 'साम टीव्ही'नं केला उघड; रिपोर्टर सागर आव्हाडांच्या धाडसाचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Update: DCM सुनेत्रा पवारांची बैठक सुरू असतानाच विभागीय वन अधिकाऱ्याला ४५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Saturday Horoscope : मनात राग ठेवू नका, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदी; वाचा शनिवारचे राशीभविष्य

Water Intake: वय, वजन आणि ऋतूनुसार बदलते पाण्याची गरज; जाणून घ्या दिवसभरात किती पाणी प्यावं?

SCROLL FOR NEXT