MHADA Lottery 2024 Saam TV
लाईफस्टाईल

MHADA Lottery 2024 : मुंबईत तब्बल 2030 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; आजपासून ऑनलाइन अर्ज करता येणार

Ruchika Jadhav

संजय गडदे, मुंबई

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे मुंबईत 2030 घरांची जाहिरात काढण्यात आली आहे. जाहिरात आल्यानंतर अर्ज केव्हा भरायचा याबाबत नागरिकांच्या मनात उत्सुकता होती. अशात अर्ज भरण्याची तारीख आणि वेळ आजपासूनच सुरू होत आहे.

आज दुपारी १२ वाजल्यापासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम मालाड या ठिकाणी ही घरे उपलब्ध असणार आहेत. मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी म्हणावी लागेल.

मुंबई मंडळाच्या २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे हे घर मिळवण्यासाठी तुम्ही आजपासूनच अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.

अर्ज कसा भरायचा?

IHLMS 2.0 या अँड्रॉइड ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करून म्हाडा लॉटरीसाठी सहभाग घेता येणार आहे.|

https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

म्हाडाच्या अर्जाची किंमत किती आहे?

म्हाडाचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ५०० रुपये + जीएसटी @ १८% म्हणजे ९० रुपये, एकूण ५९० रुपये अर्ज शुल्क लागणार आहे. हा अर्ज शुल्क विना परतावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT