Mental Stress Disease
Mental Stress Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Mental Stress Disease : मानसिक तणावामुळे वाढतोय जीवघेण्या आजारांचा धोका !

कोमल दामुद्रे

Mental Stress Disease : आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला थोडाफार तरी तणाव असतोच परंतू हा मानसिक तणाव खूप जास्त वाढल्याने आपल्या आरोग्यचे नुकसान होऊ शकते. मानसिक ताण वाढल्याने कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

मानसिक ताण हा आपल्या मनाशी संबंधित आजार आहे. त्याचा परिणाम आपल्या कामाच्या क्षमतेवर होतो. कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही, झोप पूर्ण न होणे, अस्वस्थ वाटणे या समस्या निर्माण होतात. तसेच तणावामुळे मधुमेह होण्याचा धोकाही अधिक वाढतो. मधुमेह आणि तणाव हे एकमेकांशी संबंधित आहे, असे अनेक संशोधनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मानसिक तणावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होतो,असे आयुर्वेदात देखील मान्य केले. मधुमेह आणि तणाव यांच्यातील एकमेकांशी असलेला संबंध आयुर्वेदात दर्शवला आहे. अलीकडच्या काळात झालेल्या काही संशोधनात या कल्पनांना समर्थन दिले गेले आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा केली आहे.

दीर्घकाळ तणावाची स्थिती तुमच्या शरीरात कोर्टीसोल आणि कार्टीकोट्रोपिनचे लेव्हल वाढवते. या वाढलेल्या हार्मोन्समुळे चिंता आणि मुडस्विंगस सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तणाव (Stress) जास्त वाढतो परिणामी झोप नीट होत नाही आणि झोपेच्या कमतरतेमुळे इतर आजार (Disease) होण्याची शक्यता वाढते.

1. योग आणि ध्यान

अनेक प्रकारचे आजार दूर ठेवण्यासाठी योगा खूप फायदेशीर असते. तसेच तुम्ही रोज मेडिटेशन करून तुमचा तणाव कमी करू शकता. मधुमेह रुग्णांनी दररोज योगासने आणि ध्यान करावे. याचे अनेक चांगले फायदे त्यांना नक्कीच होतील. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी योगासन काम करते आणि इतर आजारापासून दूर राहण्यास देखील योगासने मदत करते. रोज नियमितपणे मेडिटेशन करून तुम्ही तणावमुक्त आयुष्य जगू शकता.

2. यामध्ये आपल्याला कोणती लक्षणे आढळतात हे पाहूया

  • मधुमेहाचे (Diabetes) लक्षणे

  • चिडचिड होणे

  • जखमा भरण्यास वेळ लागणे

  • खूप जास्त थकवा

  • अचानक वजन कमी होणे

  • नजर कमी होणे

  • जास्त तहान आणि भूक वाढणे

  • वारंवार मूत्रविसर्जन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

Special Report | मुंबईत नोकरी, मात्र मराठी माणसाला 'नो एन्ट्री', गुजराती कंपनीचा मराठी विरोधी फतवा?

Nashim Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस नेत्यांना यश.. ९ दिवसांनंतर राजीनामा मागे

Special Report : Kolhapur Lok Sabha | कोल्हापूरचा आखाडा कोण जिंकणार?

OTT Release Date: थ्रिलर अन् ॲक्शनपटाची यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांना मेजवानी, जाणून घ्या चित्रपट, वेबसीरीजची यादी

SCROLL FOR NEXT