IRON DEFICIENCY IN MEN SYMPTOMS, CAUSES, AND VITAL HEALTH TIPS saam tv
लाईफस्टाईल

Health Tips : आयर्नची कमतरता फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरुषांनीही जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

IRON DEFICIENCY IN MEN : आयर्नची कमतरता फक्त महिलांपुरतीच मर्यादित नसून, पुरुषांमध्येही आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे पुरुषांनीही या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच सावध होऊन योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Saam TV News

आयर्न हा शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, जो शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतो. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये आढळणारे प्रोटीन आहे, जे फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेऊन शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचवते. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते, तेव्हा हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि हळूहळू ॲनिमिया होऊ शकतो.

लोहाची कमतरता सामान्यतः महिलांशी जोडली जाते, पण पुरुषही यामधून सुटलेले नाहीत. पुरुषांमधील लोहाची कमतरता कधीही दुर्लक्षित करू नये, कारण अनेकदा लोक याकडे साधी थकवा किंवा अशक्तपणा समजून दुर्लक्ष करतात. जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती

लोह कमतरतेची प्रमुख लक्षणे

सतत थकवा आणि अशक्तपणा

पुरुषांमध्ये लोहच्या कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही दिवसभर अशक्तपणा किंवा मरगळ जाणवत असेल, तर हे शरीरात आयन कमी असल्याचे संकेत असू शकतात. शरीराच्या ऊतींपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे असे होते.

हृदयाचे ठोके वाढणे

लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. अशा वेळी शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागतात. यामुळे थोडीफार शारीरिक हालचाल केल्यावरही धाप लागणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने पडल्यासारखे वाटू शकते.

त्वचा पिवळसर पडणे

लोहाच्या कमतरतेमुळे त्वचा नेहमीपेक्षा जास्त पिवळी दिसू शकते. विशेषतः चेहऱ्यावर, डोळ्यांच्या खालच्या भागाच्या आतील बाजूस आणि नखांवर हा पिवळसरपणा दिसून येतो. मात्र, फक्त त्वचेचा रंग पाहून आयन कमतरतेची खात्री करता येत नाही.

डोकेदुखी आणि चक्कर येणे

शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. यामुळे वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे आणि एकाग्रता साधण्यात अडचण निर्माण होऊ शकते.

केस गळणे आणि नखे कमजोर होणे

लोहाच्या कमतरतेचा प्रभाव केस आणि नखांवरही दिसू लागतो. काही लोकांचे केस जास्त गळू लागतात, तर नखे कमजोर, पातळ किंवा सहज तुटणारी होतात.

हात-पाय थंड पडणे

शरीरात आयन कमी असल्यावर काही जणांना हात आणि पाय नेहमीपेक्षा जास्त थंड जाणवू शकतात.

लोहाची कमतरता कशी ओळखावी आणि बचाव कसा करावा?

जर एखाद्या पुरुषाला सतत थकवा, अशक्तपणा, श्वास लागणे किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

त्याचबरोबर, लोहाची कमतरता टाळण्यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, डाळी, राजमा, हरभरा, सोयाबीन, तीळ आणि आयनयुक्त फोर्टिफाइड अन्नपदार्थ हे याचे उत्तम स्त्रोत आहेत. मांसाहार करणारे लोक मांस आणि माशांच्या सेवनानेही लोहाची कमतरता दूर करू शकतात. याशिवाय आवळा, लिंबू, पेरू आणि संत्री यांसारखे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीर लोह चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bike Battery: बाईकची बॅटरी साधारण किती वर्षे टिकते?

Cabinet Reshuffle: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? महाराष्ट्रातील नेत्यानं दिली महत्वाची अपडेट

कल्याण-उल्हासनगरची वाहतूक कोंडी फुटणार; ३२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट, शिंदेंचा मोठा निर्णय!

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अस्तंबा ऋषींच्या यात्रे उत्सवाला सुरुवात

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला 'या' 5 वस्तू चुकूनही घरात येऊ देऊ नका; जाणून घ्या कोणत्या गोष्टी मानल्या जातात अशुभ

SCROLL FOR NEXT