Men Health Tips
Men Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Men Health Tips : पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी का होतेय? असू शकतात 'या' वाईट सवयी, वेळीच व्हा सावध !

कोमल दामुद्रे

Men Health Tips : हल्ली प्रत्येक वैवाहिक नात्यात जितकी प्रेमाची गरज आहे तितकीच लैंगिकतेची सुद्धा. लैंगिक जीवनाचे समाधान प्रत्येक जोडप्याला हवे असते. त्यातल्या एखाद्या जरी व्यक्तीकडून हवे तसे सुख मिळाले नाही तर त्याच्या आपल्या नात्यावर परिणाम होऊ लागतो.

लैंगिक जीवन सुखकर नसले की, आपल्या जोडीदाराचे (Partner) मन दुसरीकडे वळू लागते पण तसेच याचा त्रास आपल्या पुढील जीवनावर देखील होऊ लागतो. पुरुषांमध्ये असणाऱ्या काही वाईट सवयींचा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो. जास्त ताण घेणे, चुकीचे खाणे आणि चुकीची जीवनशैली (Lifestyle) यामुळे तुमची प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुमच्या सेक्स ड्राईव्हमध्ये काही समस्या असेल तर त्यामागे काही सवयी असू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगतो की आज कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत? (Latest Marathi News)

या वाईट सवयींमुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते-

1. ताण घेणे-

तुम्हालाही बोलण्यातून ताण येतो का? त्यामुळे सावध राहा कारण पुरुषांमध्ये तणावामुळे शुक्राणूंची संख्याही कमी होऊ शकते. पुरुषांमध्ये, चिंता आणि तणावामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे आजपासूनच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तणावापासून दूर राहा.

2. व्यायाम न करणे-

व्यायाम न केल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दुसरीकडे, लठ्ठपणामुळे, तुमच्या शुक्राणूंची गतिशीलता मंदावते. ज्याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच एका जागी बसण्याची सवय तुम्ही आजपासूनच सोडली पाहिजे तर दुसरीकडे पुरुषांनी रोज व्यायाम केला पाहिजे.

3. रात्री उशिरा झोपण्याची सवय -

रात्री उशिरा झोपल्यामुळे तणाव आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी जागरण केल्यामुळे मानसिक त्रास होतो आणि तुमची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीपासून लांब रहा.

4. मद्यपानाची सवय -

दारू, तंबाखूचे सेवन पुरुषांसाठी घातक ठरू शकते. कारण अल्कोहोलच्या अतिसेवनाने टेस्टोस्टेरॉनवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या स्पर्म काउंटवरही त्याचा परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेतील विवाहसोहळ्यात पैठणीची थीम; कलाकारांनी दिली पारंपरिक पोशाखाला पसंती

Maharashtra Election Voting LIVE : नंदुरबारमध्ये विक्रमी मतदान होण्याची शक्यता; १ वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान

Chhatrapati Sambhajinagar News: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं, हजारो किमीचा प्रवास

Chandrashekhar Bawankule: महाविकास आघाडीचा फुगा फुटणार : चंद्रशेखर बावनकुळे, Video

Ravindra Waikar Meet Raj Thackeray | रवींद्र वायकरांसाठी राज ठाकरे सभा घेणार?

SCROLL FOR NEXT