Measles virus Saam Tv
लाईफस्टाईल

Measles virus : मुंबईत वाढला गोवरचा धोका, अशाप्रकारे घ्या बाळाची काळजी

गोवरमुळे रुग्णाला ताप, त्वचेवर पुरळ उठणे, घसा खवखवणे, खोकला यांसारख्या समस्या सुरू होतात.

कोमल दामुद्रे

Measles virus : गोवर या गंभीर आजाराने देशाची चिंता वाढवली आहे. मुंबईत सध्या गोवरचा उद्रेक सुरु आहे. 'गोवर' हा आजार (Disease) एका विषाणूमुळे होतो जो सहज पसरतो. हा आजार मुलांसाठी गंभीर आणि घातक मानला जातो. याला अनेक ठिकाणी 'रुबेला' असेही म्हणतात.

गोवरमुळे रुग्णाला ताप, त्वचेवर पुरळ उठणे, घसा खवखवणे, खोकला यांसारख्या समस्या सुरू होतात. या आजारामुळे रुग्णाच्या पवननलिका आणि श्वसनसंस्थेला गंभीर नुकसान होते. देशात कोरोना व्हायरस आणि मंकीपॉक्सच्या संसर्गानंतर गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

गोवर ग्रस्त व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देखील संक्रमित करू शकते. गोवरला रुबेओला असेही म्हणतात. या आजारात डोक्यावर आणि आजूबाजूच्या त्वचेवर लाल ठिपके आणि पुरळ दिसू लागतात, त्यानंतर हळूहळू हे डाग संपूर्ण शरीरात पसरू लागतात. विशेषत: लहान मुलांना या आजाराचा धोका जास्त असतो. हा संसर्ग कसा टाळता येईल ते जाणून घेऊया.

या गोष्टी लक्षात ठेवा (How to Prevent Measles in Marathi)

  1. गोवर हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. त्यामुळे बाधित रुग्णांपासून अंतर ठेवा.

  2. गोवर हा पॅरामिक्सोव्हायरस कुटुंबातील विषाणू आहे. याचा संसर्ग झाल्यावर हा विषाणू शरीरातील पेशींवर हल्ला करू लागतो आणि हळूहळू त्याची लक्षणे संपूर्ण शरीरात दिसू लागतात. हा रोग 4 टप्प्यात पसरतो.

  3. पहिला उष्मायन, दुसरा प्रोड्रोमल, तिसरा पुरळ आणि चौथा रिकव्हरी

गोवर टाळण्यासाठी उपाय

  • संसर्ग झाल्यास लवकर लक्षणे ओळखून उपचार केले पाहिजेत. यासाठी मुलांची तपासणी करून, त्यानंतर आवश्यक उपचार सुरू करता येतील. गोवर होऊ नये म्हणून ही खबरदारी लक्षात ठेवा.

  • जर एखाद्याला गोवराचा संसर्ग झाला असेल, तर सर्वप्रथम रुग्णाला वेगळे ठेवावे म्हणजे त्याने इतरांच्या संपर्कात येऊ नये कारण ते संपर्कात आल्यास इतर लोकांनाही संसर्ग होऊ शकतो.

  • या आजारात रुग्णाला पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते. या आजाराच्या उपचारासाठी कोणतेही निश्चित औषध नाही. त्यामुळे डॉक्टर रुग्णाला लक्षणांच्या आधारे औषधे देतात.

  • शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. यासाठी पाणी आणि द्रव पेयांचे सेवन करावे. तुम्ही सूप, ज्यूस आणि हर्बल चहा यांसारख्या पदार्थ मुलांना खाऊ घाला

  • गोवर होऊ नये म्हणून अ जीवनसत्त्व असलेले पदार्थ मुलांना खाऊ घालावेत कारण शरीरात अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गोवरचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT