Budhwar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Budhwar che Upay: लग्नही होईल, बिझनेसमध्येही मिळेल पैसा; बुधवारच्या दिवशी गणपतीचे हे उपाय करा

Wednesday Remedies : बुधवारचा दिवस हा भगवान गणेश आणि बुध देवाला समर्पित केला जातो. या दिवशी केलेले उपाय आपल्यासाठी यशस्वी ठरू शकतात. हे उपाय केल्याने तुम्ही सर्व समस्यांपासून लवकर मुक्त होऊ शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जून महिन्याच्या ४ तारखेला म्हणजेच आज जेष्ठ शुक्ल पक्षातील नववा दिवस असून बुधवार आहे. नवमी तिथी बुधवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. तर सकाळी 8 वाजून 29 मिनिटांपर्यंत वज्र योग असणार आहे. याशिवाय सिद्धी योग सुरू होणार आहे. बुधवार हा गणपती बाप्पाचा वार मानला जातो. बुधवारी जीवनात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी काही उपाय करू शकता.

बुधवारी तुम्ही कोणते उपाय करू शकता

कामात यश

ज्यांना आपल्या कोणत्याही विशेष कार्यात यश मिळवायचं आहे. त्यांनी गरजूंना तांबे, गूळ, गहू किंवा डाळ दान करण्याबरोबरच दिवसभर डोक्यावर पांढरी टोपी किंवा पगडी बांधून ठेवावी. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

समस्या होतील दूर

तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आजच्या दिवशी मंदिरात 1.25 किलो अन्नासह थोडं पांढरं मीठ दान करा. आज असे केल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या लवकर दूर होण्यास मदत होणार आहे.

आर्थिक परिस्थिती

जर तुम्हाला तुमची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर या दिवशी तांब्याच्या भांड्यात लाल फुलं आणि गव्हाचे काही दाणे पाण्यासोबत टाकून सूर्यदेवाला अर्पण करावे. यामुळे तुमची आर्थिक बाजू चांगली होण्यास मदत होईल.

मंत्राचा जप

समाजात आपला सन्मान वाढवायचा असेल तर आज चोवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. मंत्र पुढीलप्रमाणे आहे - ॐ भूर्भुव स्वः तत सावितुर्वरेण्यम भरगो देवस्या धिमाही धियो यो नह प्रचोदायत। यावेळी गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर समाजात तुमचा सन्मान वाढण्यास मदत होऊ शकते.

बिझनेसमध्ये यश

जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप यशस्वी करायची असेल तर या दिवशी गायीला बाजरीची भाकरी खाऊ घातल्यानंतर एका ब्राह्मणाला सव्वा किलो गहू दान करा. बिझनेस पार्टनरसोबत तुमची पार्टनरशिप यशस्वी होणार आहे.

लग्नाच्या समस्या सुटतील

लव्ह मॅरेज करायचं आहे मात्र काही कारणामुळे अडथळे येत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. यासाठी आजच्या दिवशी मंदिराच्या पुजाऱ्याचा आशीर्वाद घेण्याबरोबरच त्या मंदिरात तांब्याचं भांडं दान करा. यामुळे सगळे अडथळे दूर होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT