Thursday salt remedies for marriage saam tv
लाईफस्टाईल

Thursday salt remedies: लग्न होईल आणि घरी पैसाही येईल; गुरुवाच्या दिवशी मीठाचे हे ४ उपाय करून पाहा

Thursday salt remedies for marriage: ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रह वैवाहिक सुख, धन, ज्ञान आणि भाग्याचा कारक मानला जातो. जर तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती मजबूत नसेल किंवा तुम्हाला लग्न जुळण्यात किंवा आर्थिक अडचणी येत असतील, तर गुरुवारी मिठाचे काही सोपे उपाय करणे लाभदायक ठरू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सनातन धर्मात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राला खूप महत्त्व देण्यात येतं. धार्मिक ग्रंथ आणि शास्त्रं हे जीवनातील समस्या सोडवण्याचं आणि सुख-समृद्धी आणण्याचे अनेक मार्ग आपल्याला स्पष्ट करतात. या उपायांपैकी एक म्हणजे मीठाचे उपाय करणं. असं म्हणतात गुरुवाच्या दिवशी मीठाचे उपाय करणं तुम्हाला लाभदायक ठरू शकतं.

सामान्यपणे मीठाचा वापर हा घरांमध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरलं जातं. मात्र असं असलं तरीही , ज्योतिषशास्त्रानुसार साधं दिसणारे मीठ आर्थिक संकटांपासून मुक्त होण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी देखील खूप प्रभावी ठरण्यास मदत करतं. गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवगुरू गुरू यांना समर्पित केला आहे. या दिवशी केलेले मीठाचे उपाय खूप फलदायी ठरतात.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, असे अनेक छोटे आणि शक्तिशाली उपाय आहेत, जे गुरुवारी चांगल्या मनाने केले तर तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. यावेळी तुमच्या पैशाचा मार्ग मोकळा होण्यासही मदत होते. यावेळी मिठाशी संबंधित असे ३ अचूक उपाय आहेत जे तुम्ही गुरुवारी वापरून पाहू शकता. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करू शकता.

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी गुरुवारी मीठाचे कोणते उपाय करावेत?

मिठाने फरशी पुसणं

गुरुवारी विशेषतः सकाळी घरात फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर मीठ यामध्ये खडे मीठ असल्यास अधिक चांगलं ठरतं. हे मीठ टाकून पुसल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात असे मानले जाते.

बाथरूममध्ये मीठ ठेवणं

बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीत किंवा भांड्यात खडे मीठ ठेवावे. हे मीठ दर आठवड्याने बदलत राहणं गरजेचं आहे. असं मानलं जातं की, हे मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ लागते.

व्यवसायाच्या ठिकाणी मीठ

जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर तुमच्या दुकानात किंवा कार्यालयात एका कोपऱ्यात थोडं खडे मीठ ठेवावं. यामुळे व्यवसायात वाढ होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे.

हात धुण्यासाठी मिठाचा वापर

दिवसातून एकदा तरी शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने हात धुतले पाहिजेत. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. याशिवाय धन आकर्षित होतं असं मानलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood News : अक्षय-हृतिकची कोर्टात धाव, Bollywood मध्ये AIचा गैरवापर, बॉलिवूड हादरले | VIDEO

Crime: कोल्हापुरात पहाटे रक्तरंजित थरार! दारुसाठी पैसे दिले नाही, तरुणाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

Marathwada Farmer: संकट काही संपेना! आधी अतिवृष्टीने झोडपलं, आता मदत मिळायला अडथळा, e-KYC मुळे ११ लाख शेतकऱ्यांची दिवाळी कडू

Priya Berde : प्रिया बेर्डे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT