Chanakya Neeti: 4 important lessons for harmony and happiness in married life saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

Marriage Tips from Chanakya Neeti : चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातीलच काही गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत

Bharat Jadhav

  • चाणक्य नीतीत वैवाहिक जीवनात समजूतदारपणावर भर दिला आहे.

  • राग, चिडचिड आणि कटकट यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.

  • प्रेम, विश्वास आणि संयम वैवाहिक नात्याची गुरुकिल्ली आहे.

आचार्य चाणक्य यांची तत्वे आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांच्या तत्वांमध्ये चाणक्य यांनी परस्पर संबंध आणि परिस्थितीवर आधारित नातेसंबंधांचे बारकावे समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात कसं वागावं याचेदेखील उपदेश केले आहेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण बाबत त्यांनी उपदेश केलेत. यासह माणसाचं वैवाहिक जीनव कसं असावं याबाबतही त्यांनी उपदेश केलेत.

प्रेम

पती-पत्नी ही संसाराची दोन चाकं आहेत, त्यामुळे पती -पत्नीमध्ये प्रेम असावं. प्रेम हाच त्यांच्या नात्याचा पाया आहे. जर पती पत्नीमध्ये प्रेम असेल तर संसार आनंदाचा होत असतो.

प्रामाणिकपणा

पती-पत्नीच्या नात्यात प्रामाणिकपणा असावा. एकदा लग्न झालं की पती असो किंवा पत्नी दोघांनीही आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. दोन्हीपैकी एक जरी आपल्या नात्याबद्दल प्रामाणिक नसेल तर ते नाते फार काळ टिकत नाही.

अभिमान

चाणक्य म्हणतात नात्यात कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ अभिमान बाळगू नका. किंवा श्रेष्ठत्वाची भावना ठेवू नका. मी पती पेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा मी पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी भावना ठेवली तर संसारात वाद वाढत असतात. दोघेही एकमेकांना कमी दाखवत असतात.

स्वार्थ

चाणक्य म्हणतात संसारामध्ये कोणतेही निर्णय स्वार्थापोटी घेऊ नका. आपल्या जोडीदाराचाही विचार करा, तरच तुमच्या घरात सूख, समृद्धी येईल.

आचार्य चाणक्य यांच्या मते, नातेसंबंधांचे खरे मूल्य संकटाच्या वेळीच कळत असते. आपण अनेकदा असे मानतो की आपले कुटुंब आणि नातेवाईक नेहमीच आपल्यासोबत असतात, परंतु खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा आपण अडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतो. त्यामुळे नाते ओळखण्यात काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KamaltaI Gawai : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाणार का? सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलताई गवईंनी स्पष्टच सांगितलं

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

SCROLL FOR NEXT