Haunted Park maple saam tv
लाईफस्टाईल

Haunted Park: स्मशानाच्या बाजूला बनवलंय 'हे' खेळण्याचं पार्क; रात्री अशा रहस्यमयी घटना घडतात की...!

Haunted Park: तुम्ही यापूर्वी कधी भयावह पार्कबद्दल ऐकलं आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच कथित झपाटलेल्या लहान मुलांच्या खेळण्याच्या पार्कबद्दल सांगणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

जगभरात अनेक हॉन्टेड म्हणजेच भयावह जागा आहेत. यातील अनेक जागांपैकी आपण ऐकलं असेल. कधी यामध्ये भयानक बंगले, किल्ले किंवा घरांचा समावेश असतो. मात्र तुम्ही यापूर्वी कधी भयावह पार्कबद्दल ऐकलं आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच कथित झपाटलेल्या लहान मुलांच्या खेळण्याच्या पार्कबद्दल सांगणार आहोत.

असं म्हटलं जातं हे पार्क झपाटलेलं असून या ठिकाणी मृत लहान मुलाच्या आत्मा खेळायला येतात. या जागेचा भीषण इतिहास आणि भितीदायक घटनांमुळे हे ठिकाण 'मृत मुलांच्या खेळण्याचं पार्क' म्हणून ओळखलं जातं.

आपोआप हलू लागतो झोपाळा

हे स्थान अमेरिकेतील हंट्सविले, अलाबामा या ठिकाणी आहे. या लहान मुलांच्या पार्कमध्ये इतर पार्कप्रमाणे खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंडी अशा गोष्टी आहे. हे खेळाचं मैदान इतर उद्यानांसारखे दिसतं परंतु ते सामान्य पार्कप्रमाणे नाहीये.

असं म्हटलं जातं, या पार्कमध्ये असलेले झोपाळे आपोआप हलू लागतात. या उद्यानाजवळून जाणारे लोक बरेचदा हे झुले स्वतःहून हलताना दिसतात. या झोपाळ्यांकडे पाहून त्यावर कोणीतरी बसलं असल्याचाही भास होतो.

स्मशानभूमीच्या शेजारी उभारण्यात आलंय हे पार्क

समोर आलेल्या माहितीनुसार, हे उद्यान मॅपल हिल स्मशानभूमीच्या शेजारी बांधण्यात आलं आहे. स्पॅनिश फ्लूच्या साथीच्या वेळी मृत्यू झालेल्या रूग्णांना या ठिकाणी पुरण्यात आलं होतं. त्यामुळे अशा घटना घडतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

लहान मुलांना पुरण्यात आल्याची माहिती

1918 च्या स्पॅनिश फ्लूच्या साथीच्या काळात या ठिकाणी अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या मृत मुलांना या खेळाच्या मैदानाशेजारी असलेल्या मॅपल हिल प्लॉट स्मशानभूमीत पुरण्यात आलं. स्थानिकांच्या म्हणण्यांनुसार, अंधार पडल्यानंतर मुलांचे आत्मे रात्रीच्या वेळी या मैदानात खेळण्यासाठी बाहेर येतात. बऱ्याच लोकांचा असा दावा आहे की, रात्री अकरा ते पहाटे ३ च्या वेळेत या ठिकाणी अनेक भयानक घटना घडतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT