पुरुषाला व्हायचं होतं महिला, यूट्यूब पाहून दोघांनी केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया अन्...  Saam TV
लाईफस्टाईल

पुरुषाला व्हायचं होतं महिला, यूट्यूब पाहून दोघांनी केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया अन्...

श्रीकांत बी फार्माच्या या दोन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला आणि त्याने या लोकांकडे लिंग शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली.

वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशमधील बी फार्मच्या दोन तरुणांनी YouTube वरती व्हिडिओ पाहून २८ वर्षीय मजूराची लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या या जीवघेण्या शस्त्रक्रियेनंतर कामगाराचा मृत्यू झाला आहे. 28 वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे, तो प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी असून तो हैदराबादमध्ये रोजंदारी मजूर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत काही काळापासून पत्नीला सोडून एकटा राहत होता.

कमी खर्चात काम केल्याचे कारण दिले होते

घटनेनुसार, श्रीकांत बी फार्माच्या या दोन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला आणि त्याने या लोकांकडे लिंग शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकांतला प्रक्रियेसाठी मुंबईला जायचे असले तरी, दोन्ही पदवीधरांनी त्याला त्यांच्या जागेवर परवडणाऱ्या दरात ऑपरेशन करण्याचे पटवून दिले. शस्त्रक्रियेसाठी दोघांनी एका खासगी लॉजमध्ये भाड्याने खोली घेतली. मस्तान आणि जीवा या दोन विद्यार्थ्यांनी यूट्यूबवरील व्हिडिओ फॉलो करून ऑपरेशनची प्रक्रिया सुरू केली. पण दुर्दैवाने ऑपरेशन दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने श्रीकांतचा मृत्यू झाला. लॉज कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह आढळल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी वरील दोन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

दोन्ही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी यूट्यूब पाहून ऑपरेशन करणाऱ्या मस्तान आणि जीवा या विद्यार्थ्यांना पकडले आहे. या संदर्भात पोलिसांनी सध्या दोन्ही विद्यार्थ्यांची बारकाईने चौकशी सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा प्रकाशम जिल्ह्यातील जरुगुमल्ली मंडलातील कामेपल्ली गावची रहिवासी होती. 2019 मध्ये त्याने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले. मात्र वैयक्तिक वादामुळे वर्षभरातच ते वेगळे झाले. आपल्या लिंग पसंतीमुळे त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT