Male Condom Mistakes Saam Tv
लाईफस्टाईल

Male Condom Mistakes : निरोध वापरताना 'या' चुका करताय? होऊ शकतो भयंकर आजार

लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी निरोध हा सोपा उपाय आहे.

कोमल दामुद्रे

लैंगिक आजार टाळण्यासाठी किंवा नको असलेल्या गर्भधारणेपासून (Pregnant) स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी निरोधचा वापर खूप महत्त्वाचा आहे. स्त्री (Female) आणि पुरुष दोघांनीही त्याचा वापर करावा. पुरुषांनी या विषयावर विशेष लक्ष दिले पाहिजे. निरोध वापरताना त्यांच्याकडून अनेक चुका होतात. त्यांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

लिंगसांसर्गिक आजार टाळण्यासाठी निरोध हा सोपा उपाय आहे. मात्र निरोधमुळे शंभर टक्के संरक्षण मिळेल याची काही हमी नाही. कारण निरोध केवळ शिश्न झाकू शकते. आजूबाजूला जंतू असण्याची शक्यता असतेच. निरोध वापरण्याची योग्य पद्धत माहित असली तरीही या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

१. निरोधचे पॅकेट दात/नखांनी उघडणे -

निरोधचे पॅकेट दात किंवा नखांनी उघडल्यास ते खराब होऊ शकते. तीक्ष्ण वस्तूंनी पॅकेट कधीही उघडू नये. कंडोमचे पॅकेट दातांनी उघडल्याने तोंडातील बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची किंवा निरोध फाटण्याची भीती असते.

२. निरोधच्या पॅकेट तपासून पहा -

निरोध वापरण्यापूर्वी ते कुठेतरी फाटले किंवा कापले आहे का ते तपासा, कारण असे झाले तर असा निरोध वापरण्यात काही अर्थ नाही.

३. कृती सुरू झाल्यानंतर वापरणे -

अनेक पुरुष निरोधचे स्खलन झाले नसेल तर तेच कंडोम पुन्हा वापरतात. या चुकीमुळे दोघांना संसर्ग होऊ शकतो किंवा तो फाटला तर गर्भधारणा देखील होऊ शकते. कोणताही निरोध एकदाच वापरा.

४. कालबाह्यता तारीख तपासत नाही -

निरोधची एक्सपायरी डेट कोण तपासते? कारण ती खाण्याची गोष्ट आहे का आपल्याला असे वाटते. पण हे औषधासारखे आहे हे माहीत असावे. त्याची एक्सपायरी डेट असते. त्यानंतर वापरता येणार नाही. त्यामुळे एक्सपायरी डेट तपासल्याशिवाय निरोध वापरू नका.

५. निरोध काढताना चूक -

केवळ निरोध घालणे, खरेदी करणे किंवा ठेवणे ही चूक नाही. वापरल्यानंतर योग्यरित्या विल्हेवाट लावणे देखील गरजेचे आहे. याच्या वापरामूळे वीर्य बाहेर पडते किंवा खराब होतो. त्यामुळे वीर्यपतनानंतर, शिश्न मोकळे होण्याआधी निरोधची रिम काळजीपूर्वक काढून टाका.

६. वापर समजून न घेता निरोध खरेदी करणे -

निरोधचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक निरोधचे वेगवेगळे फायदे असतात, त्यामुळे गरजेनुसार निरोध खरेदी करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT