Beauty Skin Tips Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : रखरखत्या उन्हात मेकअप मेल्ट होतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा, घाम आला तरी स्किन ग्लो करेल

Makeup Summer Tips : मेकअप केल्यावर उन्हात गेल्यानंतर लेगचच घाम येतो आणि मेकअप मेल्ट होतो. त्यामुळे आज त्यावरील उपाय जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सध्या जास्त प्रमाणात उष्णता वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. त्यात मुलींना बाहेर ऑफिसला किंवा काही फंक्शनला जाताना मेकअप करावा वाटतो. मात्र मेकअप केल्यावर उन्हात गेल्यानंतर लेगचच घाम येतो आणि मेकअप मेल्ट होतो. त्यामुळे आज त्यावरील उपाय जाणून घेऊ.

मेकअप करण्याआधी ही काळजी घ्या

मेकअप करण्याधी एखाद्या माइल्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सूती किंवा सॉफ्ट रुमालाने चेहरा पुसून कोरडा करून घ्या. स्किन पूर्ण कोरडी झाल्यावर मेकअप करण्यास सुरुवात करा. चेहरा न धुता मेकअप केल्याने तो सेट होत नाही.

जास्त मेकअप करू नका

मेकअप करताना विशेष काळजी या गोष्टीची घ्या की तुम्ही जे प्रोडक्ट लावत आहात ते एकावर एक लावू नका. पहिली क्रीम चेहऱ्यात छान एब्सोर्ब झाल्यानंतर दुसरी क्रीम लावा. तसेच मेकअपमध्ये सिरम, मोश्चराईज आणि सनस्क्रीनचा वापर करा.

बेक पावडर

मेकअप केल्यावर चेहऱ्यावर लावण्यासाठी विविध ब्रँडच्या बेक पावडर मिळतात. बेक पावडर लावल्याने मेकअप छान सेट होतो. त्यामुळे मेकअप झाल्यावर चेहऱ्यावर बेक पावडर नक्की लावा.

मेकअप फिक्सर

मेकअप फिक्सर हे एक लिक्वीड आहे. बॉटलमध्ये ते स्प्रेच्या स्वरुपात असतात. त्यामुळे मेकअप झाला की फिक्सर स्प्रे चेहऱ्यावर अप्लाय करा. त्याने उन्हात गेल्यावर देखील मेकअप नीट राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abdominal Symptoms: पोटदुखी अचानक वाढलीये? कॅन्सरचा असू शकतो धोका, वाचा तज्ज्ञांचे मत

Kobi Pakoda Recipe: थंडीच्या दिवसात संध्याकाळच्या नाश्त्याला खा कुरकुरीत कोबीची भजी, एकदा खाल तर खातच राहाल

Accident News : पुण्यात पुन्हा अपघाताचा थरार, ड्रायव्हर बसमधून लघुशंकेला उतरला; बस थेट भिंतीला आदळली, VIDEO

Nashik Crime: माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेला, मद्यधुंद पोरींचा राडा; मैत्रिणींच्या घरावर फेकले दगड

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT