Beauty Tips
Beauty Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Beauty Tips : रोज मेकअप करताय ? सुंदर दिसण्यासाठी काही वेगळे करायचे आहे ? या उत्पादनांचा वापर करा

कोमल दामुद्रे

Beauty Tips : मेकअप करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. परंतु, तो करताना प्रत्येकाला त्याच्या रंगाचा विचार करावा लागतो. जर आपल्याला न्यूड आणि न्यूट्रल मेकअपचा कंटाळा आला असेल, तर या सणासुदीच्या हंगामात आपण रोजच्या मेकअपमध्ये थोडासा रंग भरणे योग्य ठरेल.

आपला मेकअप लूक ब्राइट आणि व्हायब्रंट मेकअपने बदलण्याची हीच वेळ आहे. यासाठी आपल्याला मेकअप किटमध्ये काही मेकअप उत्पादने जोडण्याची आवश्यकता आहे.

१. कलरफूल लाइनर -

Eyeliner

तपकिरी आणि काळा लाइनर आता वापरणे कंटाळवाणे वाटते. त्यासाठी डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी थोड्या रंगांचा पॉप द्या. आपण क्लासिक ब्लॅक लाइनर टील ग्रीन, रॉयल ब्लू किंवा पिंक सारख्या रंगीत लाइनरने हे बदलू शकतो.

२. व्हायब्रंट आयशॅडो पॅलेट

vibrant eyeshadow

डोळ्यांना (Eye) अधिक बोलके करण्यासाठी आपण व्हायब्रंट आयशॅडो पॅलेटचा वापर करु शकतो. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.

३. लिप-चीक टिंट्स -

lip cheek tint

लिप-चीक टिंट्स उत्पादन बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहे आणि यासाठी अनेक कारणे आहेत. हे कॉम्पॅक्ट असून ते सहजपणे कॅरी करू शकतो. तसेच ते मल्टी-फंक्शनल देखील आहे. आपला चेहरा (Skin) उजळण्यासाठी आणि तो ओसरलेला दिसण्यासाठी आपण त्याला सतत सोबत ठेवायला हवे.

४. ब्राइट लिप शेड्स -

bright lipstick shades

आपल्या रोजच्या मेकअपसाठी न्यूड ब्राऊन्स आणि पिंक्स लिपस्टिक शेड्स आपल्याला अधिक आवडतात. पण आपला दिवस उजळवायचा असेल तर ओठांच्या न्यूड शेड्स सोडून द्या आणि बेरी, फ्यूशिया पिंक, किरमिजी रंगाचा लाल आणि अधिक उजळ लिप शेड्स घ्या.

५. मल्टी-कलर नेल्स

multi color nails

चेहऱ्याच्या सौंदर्यांबरोबर नखाचे सौंदर्य देखील आपल्याला जपायचे आहे. त्यासाठी थोडे लक्ष नखाकडे देखील द्या. त्यांना रंगीबेरंगी नेल पॉलिशने रंगवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नेल आर्टही करून पाहू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

Karnataka Politics: कर्नाटक काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव; भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार, काय आहे प्रकरण?

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

SCROLL FOR NEXT