Dhan Prapti che Upay saam tv
लाईफस्टाईल

Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी तांदळाचे 'हे' उपाय नक्की करा; एक उपाय तुम्हाला करेल मालामाल

Dhan Prapti che Upay: ज्योतिषशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्रत्येक दिवसाचे आणि वस्तूंचे एक विशेष महत्त्व आहे. शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे, जी धन आणि समृद्धीची देवी मानली जाते.

Surabhi Jayashree Jagdish

  • शुक्रवार हा लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो.

  • पांढऱ्या वस्तूंचे दान सुख-शांती आणते.

  • तांदळाची पोटली मंदिरात अर्पण करावी.

शुक्रवार हा दिवस धनाची देवी माता लक्ष्मीला अर्पण मानला जातो. या दिवशी लक्ष्मीमातेची श्रद्धेने पूजा केल्यास आयुष्यात सौभाग्य, धनवृद्धी आणि यश प्राप्त होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. शुक्रवारी केलेले काही खास उपाय आणि टोटके आर्थिक अडचणी दूर करून जीवनात प्रगती घडवून आणतात.

सुख-शांतीसाठी उपाय

शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करण्यास खास महत्व आहे. या दिवशी एखाद्या गरीब अथवा गरजू व्यक्तीला तांदळाचं दान केल्यास पुण्य मिळतं. असं मानलं जातं की, या उपायामुळे घरात सुख-शांती नांदते आणि लक्ष्मीमातेची कृपादृष्टी मिळते. त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मकता वाढते.

यश मिळवण्यासाठी उपाय

जर जीवनात वारंवार अडचणी येत असतील तर शुक्रवारी हा उपाय करून पाहा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि लक्ष्मीमातेची विधीपूर्वक पूजा करा. नंतर लाल रंगाच्या कपड्यात एक मूठ कच्चा तांदूळ आणि 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या ठेवा. याची छोटी पोटली बांधून ती मंदिरात अर्पण करा. हा उपाय अडथळे दूर करून जीवनात यश मिळविण्यास मदत करतो आणि अडकलेली कामे सुलभ होतात.

धनप्राप्तीसाठी उपाय

शुक्रवारी सायंकाळी लक्ष्मीमातेची पूजा करून लाल रंगाच्या कपड्यात थोडा कच्चा तांदूळ, केशर आणि गुलाबाची फुलं बांधा. ही पोटली मंदिरात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात पूजा करून ती पोटली घेऊन या आणि आपल्या तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. या उपायामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि पैशांची तंगी कमी होते.

लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी उपाय

घरातील नकारात्मकता दूर करून आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी हा सोपा उपाय करा. शुक्रवारी तांदळाची खीर बनवून लक्ष्मीमातेचा भोग लावा आणि त्यांची विधीपूर्वक पूजा करा. पूजा करताना ‘ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः’ हा मंत्र 108 वेळा जपा. या उपायामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होतात आणि कुटुंबावर त्यांची कृपा राहते. यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात.

शुक्रवारी कोणत्या देवतेची पूजा करावी?

शुक्रवारी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करावी.

सुख-शांतीसाठी शुक्रवारी कोणते दान करावे?

तांदळाचे दान केल्याने घरात सुख-शांती राहते.

यश मिळवण्यासाठी कोणती पोटली तयार करावी?

लाल कपड्यात कच्चा तांदूळ आणि पिवळ्या कवड्यांची पोटली बांधावी

धनप्राप्तीसाठी कोणती पोटली तिजोरीत ठेवावी?

केशर, गुलाब आणि तांदळाची पोटली तिजोरीत ठेवावी.

लक्ष्मीमातेची कृपा मिळवण्यासाठी कोणता मंत्र जपावा?

‘ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः’ हा मंत्र 108 वेळा जपावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT