Bajra sweet wada recipe  Google
लाईफस्टाईल

Makar Sankranti Recipes : मकर संक्रांतीला बनवा 'हे' पारंपारिक बाजरीचे गोड वडे

Bajra sweet wada recipe : मकर संक्रांत भारतातल्या महिला मोठ्या संख्येने साजरा करतात. हा सण नवीन वर्षातला पहिला सण आहे. या दिवशी फक्त धार्मिक गोष्टी पाळण्याची नाही तर गोड पदार्थ बनवण्याची सुद्धा पद्धत आहे.

Saam Tv

मकर संक्रांत भारतातल्या महिला मोठ्या संख्येने साजरा करतात. हा सण नवीन वर्षातला पहिला सण आहे. या दिवशी फक्त धार्मिक गोष्टी पाळण्याची नाही तर गोड पदार्थ बनवण्याची सुद्धा पद्धत आहे. देशात प्रत्येक ठिकाणी मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. तसेच तिथले पदार्थ सुद्धा वेगवेगळे तयार केले जातात. आज आपण अशाच एका पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत. त्यात बाजरीचा समावेश असणार आहे.

बाजरी ही शरीरासाठी खूप पौष्टीक मानली जाते. शिवाय थंडीच्या दिवसात बाजरी खाल्याने योग्य प्रमाणात, प्रोटीन, आयरन, मॅग्नेशियम हे महत्वाचे घटक आपल्या शरीरात जातात. तसेच या पदार्थात गुळ आणि शुद्ध तुपाचा सुद्धा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊ बाजरीच्या गोड वड्यांची स्वादिष्ठ रेसिपी.

साहित्य

बाजरीचे पीठ १ कप

बारिक केलेला गुळ दीड कप

तूप

वेलची वापडर पाव चमचा

ड्राय फ्रूट्स बारिक चिरलेले

पाककृती

सर्वप्रथम अर्धी वाटी कोमट पाणी घेऊन त्यात गुळ मिक्स करुन घ्या. आता एक कणीक मळायची परात घ्या. त्यात बाजरीचे पीठ घ्या. मग त्यात हळूहळू गुळाचे पाणी अ‍ॅड करत पीठ मळून घ्या. पुठे त्यात वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स अ‍ॅड करून मळून घ्या. सोबत एक चमचा तूपाचा वापर केला.

दूसऱ्या बाजूला तुम्ही तूप गरम करायला ठेवा. तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. आता कणीक मऊ झाल्यावर त्याचे तुम्ही लहान आकाराचे गोळे तयार करू घ्या. आता जशी तुम्ही पुरी बनवता त्याचप्रमाणे हे लाटा किंवा हाताने सुद्धा थापू शकता. मग तेलात एक एक वडा अ‍ॅड करून ते छान टम्म फुगेपर्यंत तळून घ्या. तयार आहे तुमची मकर संक्रांतीची स्पेशल डीश.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यात ऐन दुष्काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस आंदोलनाची ठिणगी

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

SCROLL FOR NEXT