Blood Glucose Levels  Saam Tv
लाईफस्टाईल

Blood Glucose Levels : रक्तातील ग्लुकोजची पातळी राखायची आहे ? या ४ गुणकारी मार्गांचा अवलंब करा

रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित कशी राखाल ?

कोमल दामुद्रे

Blood Glucose Levels : भारतीयांच्‍या आरोग्‍यविषयक समस्‍यांमध्‍ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) ने नुकतेच केलेल्‍या संशोधनानुसार भारत हा प्रौढ मधुमेही लोक असलेला जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि जगातील प्रत्येक सहावा मधुमेह असलेला व्यक्‍ती भारतीय आहे. गेल्या तीन दशकांमध्ये देशात मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत १५० टक्‍के वाढ झाली आहे.

मधुमेहाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जात असली तरी हायपोग्लायसेमियाच्या समस्‍येकडे दुर्लक्ष केले जात असल्‍यचे दिसून येते. ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्‍तातील ग्लुकोजची पातळी मानक श्रेणीपेक्षा कमी होते. रक्तातील कमी ग्लुकोजला इंसुलिन प्रतिक्रिया किंवा इंसुलिन शॉक म्हणून देखील संबोधले जाऊ शकते.

रक्‍तातील कमी ग्‍लुकोज पातळी प्रती प्रत्येक व्यक्‍तीची प्रतिक्रिया भिन्‍न असली तरी रक्‍तातील ग्‍लुकोजचे प्रमाण कमी होण्‍याची सामान्‍य लक्षणे आहेत चिंताग्रस्त होणे, घाम येणे, थंडी वाजून येणे, चिडचिड किंवा अधिरता, जलद हृदयाचे ठोके, हलक्‍या स्‍वरूपात डोकेदुखी किंवा चक्‍कर येणे. गंभीर प्रकरणांमध्ये रूग्णांना विचलित, सुन्‍न, तंद्री आणि अंधुक दृष्टी किंवा बोलण्यात अडचण अशी लक्षणे जाणवू शकतात.

पुण्‍यातील कन्‍सल्‍टण्‍ट डायबेटोलॉजिस्‍ट डॉ. सुहास एरंडे म्‍हणाले, हायपोग्लायसेमिया ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपल्या रक्‍तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी प्रमाणित श्रेणीपेक्षा कमी असते.

प्रत्येक व्यक्‍तीची ग्लुकोजची पातळी कमी झाल्यावर वेगवेगळी लक्षणे दिसतात. त्यामुळे, आपल्या रक्‍तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या ग्लुकोजचे सतत निरीक्षण करायला हवे. आज प्रिक फ्री वेदनारहित ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणे आहेत, जी ग्लुकोजच्या ट्रेंडवर रिअल-टाइम माहिती सादर करतात, व्यक्‍तीच्या ग्लायसेमिकमध्‍ये २४ तासांमध्‍ये होणारे बदल दाखवतात.

मधुमेह (Diabetes) असलेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये लक्षणे दिसून येणार नाहीत व ती लक्षात देखील राहात नाही. ज्‍यामुळे रक्‍तातील कमी झालेल्‍या ग्‍लुकोज पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन करणे आव्‍हानात्‍मक होऊन जाते. तसेच स्थिती अधिक खालावून वैद्यकीय आपत्ती येऊ शकते. हायपोग्लायसेमियाचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

१५-१५ रूल: या नियमामध्ये रक्‍तातील ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट सेवन करून १५ मिनिटांनंतर ते तपासणे समाविष्‍ट आहे. ग्लुकोजची पातळी सामान्य श्रेणीत आणण्यासाठी फळे, साखरयुक्‍त पदार्थ किंवा नियमित सोडा, मध लिंबू पाणी सारखी पेये सेवन करता येऊ शकतात. आपल्या रक्‍तातील साखरेची पातळी सुधारत नसेल तर त्‍वरित आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.

रक्तातील साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करा

Diabetes

१. हायपोग्लायसेमिया विकसित होण्याची सर्वात सामान्य परिस्थिती म्हणजे जेवण चुकणे. त्यासाठी आपण योग्य वेळी जेवण घ्यायला हवे. ज्‍यामुळे हायपोग्लायसेमियाला प्रतिबंध होईल. जेवणाच्या वेगवेगळ्या वेळामुळे आपल्याला हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका वाढतो.

२. मधुमेह व्यवस्थापनामध्ये नियमित ग्लुकोज तपासणी समाविष्‍ट करणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. सेन्सर-आधारित सीजीएम उपकरणे आहेत, जी ग्लुकोजच्या पातळीची माहिती देतात, त्यामुळे रक्‍तातील ग्लुकोज पातळी कमी झाल्यास रुग्णाला त्‍याबाबत माहिती मिळते. रक्‍तातील ग्लुकोजच्या पातळीची तपासणी केल्याने प्रभावीपणे आहारातील व्‍यवस्‍थापन, व्‍यायाम नित्‍यक्रम आणि मधुमेह असताना देखील उत्तम जीवनशैली राखण्‍यास मदत होते.

३. हायपोग्‍लायसेमियासाठी नियमित सल्‍लामसलतीकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाणे सामान्‍य असले तरी डॉक्‍टरांकडे जाऊन त्याची अपडेट ठेवा. मधुमेही व्‍यक्‍तींमध्‍ये बदल होऊ शकतात, ज्‍यामुळे डायबेटोलॉजिस्‍ट्सना रक्तातील प्रमाणित साखरेची पातळी ठेवण्‍यासाठी उपचाराबाबत नव्‍याने विचार करावा लागू शकतो.

४. मधुमेह हा गंभीर आजार आहे आणि त्याला आजीवन काळजी घेणे आवश्यक आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे सोपे व सुलभ झाले आहे. फक्‍त डॉक्टरांच्‍या संपर्कात राहणे आवश्यक आहे. काही सोप्या उपायांसह मधुमेह असलेली व्‍यक्‍ती देखील उत्‍साहात जीवन जगू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT