Mahindra Xuv700 Seating Capacity Saam Tv
लाईफस्टाईल

Family Car: 160 ची टॉप स्पीड, 16 चा मायलेज, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ही XUV

Satish Kengar

Mahindra XUV700:

तुम्हाला कुटुंबासाठी मोठ्या आकाराची आरामदायी कार घ्यायची असेल, तर महिंद्राच्या XUV700 चा तुम्ही विचार करू शकता. ही जबरदस्त SUV 160 kmph चा टॉप स्पीड देते. तसेच ही जास्तीत जास्त 16 kmpl मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.

इंजिन आणि पॅनोरामिक सनरूफ

Mahindra XUV700 मध्ये 1999 cc ते 2198 cc पर्यंतचे पॉवरफुल इंजिन आहेत. हे इंजिन 152.87 ते 197.13 Bhp पर्यंत पॉवर जनरेट करते. महिंद्राने ही कार 14.03 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत ऑफर केली आहे. या मोठ्या आकाराच्या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफसारखे लक्झरी फीचर्स आहेत.

पाच रंग पर्याय

या एसयूव्हीमध्ये पाच रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. कारचे पॉवरफुल इंजिन 380 Nm टॉर्क जनरेट करते. या आलिशान कारमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. Mahindra XUV700 ला 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. (Latest Marathi News)

या एसयूव्ही कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. ही कार 5 सीटर आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही कार बाजारात Hyundai Alcazar, MG Hector Plus आणि Tata Safari शी स्पर्धा करते. कारचे टॉप मॉडेल 26.57 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे.

Mahindra XUV700 मध्ये 6-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट आहे. कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसह 12 स्पीकर बसवण्यात आले आहेत. महिंद्राची ही पॉवरफुल कार ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि बिल्ट-इन अलेक्सा कनेक्टिव्हिटीसह येते.

कारमध्ये ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे, ज्यामुळे ती हायस्पीड कार बनते. हे कार तीन प्रकारांमध्ये येते. सुरक्षिततेसाठी आणि स्मूथ ड्राइव्हसाठी कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा आहे. कारमध्ये अँटी ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध आहे. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम देण्यात आला आहे. कारमध्ये पुढील आणि मागील दोन्ही बाजूस एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT