Momos Disadvantages saam tv
लाईफस्टाईल

Momos Disadvantages: चवीने मोमोज खाताय तर 'या' आजारांनाही देताय निमंत्रण; विचारही केला नसेल इतके धोकादायक आहेत मोमोज

Side Effects of Momos: मोमोज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडीचं बनलंय. मात्र फास्ट फूडमधील बहुतेक पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Surabhi Jayashree Jagdish

फास्ट फूड खाण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. अनेकदा बदलत्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढलेल्या ताणामुळे अनेकांना फास्ट फूड खाण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशातच एक म्हणजे पदार्थ म्हणजे मोमोज. मोमोज हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडीचं बनलंय. मात्र फास्ट फूडमधील बहुतेक पदार्थ मैद्यापासून बनवलेले असतात. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच मोमोज खाणं देखील हानिकारक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे खाल्ल्याने शरीराला अनेक आजारांनी घेरले जाऊ शकते.

सध्या वयस्कर असोत किंवा तरुण, प्रत्येकजण मोमोज खूप आवडीने खातात. ठिकठिकाणी रस्त्यावर, परिसरात आणि बाजारात तुम्हाला सिल्व्हर स्ट्रीमर गॅसवर बसवलेले मोमोज दिसतील. त्याभोवती तरुण आणि किशोरवयीन मुलांची मोठी गर्दी दिसते.

आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, मोमोज तुमचं आरोग्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहेत. हे माणसाला आतून पोकळ बनवण्याचं काम करतात. जास्त मोमोज खाल्ल्याने किडनीच्या समस्या होऊ शकतात आणि वजन वाढण्याचा धोका देखील असतो. मोमोज खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊया?

किडनीला धोका

मोमोज ज्या रसायनाने पीठ पॉलिश केलं जातं, त्याला बेंझॉयल पेरोक्साइड म्हणतात. ही तीच केमिकल ब्लीचर आहे, ज्याने चेहरा स्वच्छ होतो. जेव्हा हे बिलीरुबिन शरीरात पोहोचते तेव्हा ते किडनीचं नुकसान करू शकते.

हाडांसाठी धोकादायक

मोमोज बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. गव्हापासून बनवलेल्या रिफाइंड पिठामधून प्रथिनं आणि फायबर काढून टाकलं जातं. अशा परिस्थितीत हे प्रथिनेमुक्त पीठ खाल्ल्याने शरीराला खूप नुकसान होतं. हे आम्लयुक्त असून हाडांमध्ये जातं आणि कॅल्शियम शोषून घेतं. ज्यामुळे हाडं पोकळ बनवतात.

लठ्ठपणा वाढतो

पिठापासून बनवलेले मोमोज विकणारे काही लोक चव वाढवण्यासाठी त्यात केमिकलचा वापर करतात. या रसायनाला मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणतात. याचा वापर चव वाढवण्यासाठी आणि सुगंधित करण्यासाठी केला जातो. या केमिकलमुळे लठ्ठपणा वाढतो.

इन्फेक्शनचा धोका

मोमोजमुळे संसर्ग होऊ शकतो आणि मुलांमध्ये नवीन रक्त निर्मितीची प्रक्रिया मंदावते. याशिवाय काही ठिकाणी मांसाहारी मोमोजही बनवले जातात. बहुतेक मोमोजमध्ये मृत प्राण्यांचे मांस मिसळलं जातं.या परिस्थितीत इन्फेक्शन होण्याचा धोका वाढू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Bread Pizza Burger : ब्रेडपासून बनवा पिझ्झा- बर्गर; घरच्या घरी बनवा, रेसिपी लगेच लिहून घ्या

Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं ४४ व्या वर्षी निधन, लिव्हर इन्फेक्शनने घेतला जीव; सिनेसृष्टीवर शोककळा

३७ व्या वर्षी अजिंक्य नाईक बनले MCAचे सर्वात तरुण अध्यक्ष|VIDEO

Eyebrow Care: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT