Surabhi Jayashree Jagdish
बाजारातून आणलेलं चिकन तुम्ही नळाखाली धुता का? पण असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
चिकन धुण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया
चिकनवरील रक्त तसंच अस्वच्छ घटक तुम्ही टिश्यूपेपरनं काढू शकता.
चिकन कायम गरम पाण्याने धुतलं पाहिजे. उकळत्या पाण्यात चिकन जरा वेळ ठेवा आणि नंतर ते धुवा.
चिकन गरम पाण्याने धुतल्यानंतर त्याला मीठ आणि हळद लावल्यास यामुळे विषाणू मरतात.
चिकनचं मास तुम्ही फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर ते हवाबंद डब्यांमध्ये ठेवा. ज्यावेळी तुम्हाला ते शिजवायचं असेल तेव्हा २ तासांपूर्वी ते फ्रीजरबाहेर काढा.
चिकन, मटण आणि मासे स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडे, सुरी अगदी सिंकही गरम पाण्याने धुवावे.