Monday Special Remedies saam tv
लाईफस्टाईल

Somvar Ke Upay: भगवान शंकरांना प्रिय आहेत 'या' 5 गोष्टी; सोमवारच्या दिवशी अडचणींपासून मुक्ततेसाठी करा हे उपाय

Monday Special Remedies: हिंदू धर्मात सोमवार हा दिवस भगवान शिव (Lord Shiva) यांना समर्पित आहे. असे मानले जाते की, या दिवशी महादेव (Mahadev) त्यांच्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व दु:ख दूर करतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • सोमवारी शिवलिंगाला आवळ्याचा रस अर्पण करावा.

  • बर्फ अर्पण करणे नकारात्मक ऊर्जा दूर करते.

  • डाळिंबाचा रस मंगळदोष शमवण्यास मदत करतो.

असं म्हणतात की जर भगवान शंकर प्रसन्न झाले तर जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. सोमवार हा दिवस शंकर भगवानांना अर्पण केलेला आहे. असं म्हटलं जातं की, या दिवशी केलेला छोटासा उपायही चमत्कारिक परिणाम देऊ शकतो. बरेच लोक फक्त पूजा-पाठ करतात. परंतु जर तुम्हाला धन, आरोग्य आणि समृद्धीचा आशीर्वाद हवा असेल. तर काही खास वस्तू शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरते.

हे उपाय केल्याने केवळ आर्थिक स्थिती मजबूत होत नाही तर शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतात. चला जाणून घेऊया ज्योतिषाचार्य रवी पाराशर यांनी एका बेवसाईटला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

आवळ्याचा रस

आवळा हा आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो. मात्र तो धार्मिक दृष्टिकोनातूनही त्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. अशी मान्यता आहे की. आवळ्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. सोमवारच्या दिवशी सकाळी स्नान करून मंदिरात जा आणि श्रद्धेने शिवलिंगावर आवळ्याचा रस अर्पण करा. या उपायामुळे तुमच्या आयुष्यात धन आणि धान्याची कमी राहणार नाही.

शिवलिंगावर बर्फ अर्पण करणं

पंडित आणि ज्योतिषाचार्यांच्या मते, शिवलिंगावर बर्फ अर्पण करणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. विशेषतः सोमवारच्या दिवशी हा उपाय अधिक प्रभावी ठरतो. घरात बर्फ साठवून मंदिरात नेऊन शिवलिंगावर ठेवा आणि त्यावर गंगाजलाच्या काही थेंबा अर्पण करा. या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

डाळिंबाचा रस

जर तुमच्या आयुष्यात वारंवार अडथळे येत असतील तर ते मंगळदोषामुळे असू शकतात. अशा वेळी शिवलिंगावर डाळिंबाचा रस अर्पण करणं मंगळदोष शमवतं. श्रद्धेने दोन थेंब रसही पुरेसे असतात. हा उपाय मंगळ ग्रह संतुलित करतो आणि जीवनात सौभाग्य घेऊन येतो.

दुर्भाग्य आणि अपघातांपासून संरक्षण

डाळिंबाचा रस अर्पण करण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो जीवनातील अचानक येणाऱ्या अपघात, अनिष्ट घटना आणि दुर्दैवापासून संरक्षण करतो. जे लोक प्रवास जास्त करतात किंवा धोकादायक कामांमध्ये असतात, त्यांनी विशेषतः श्रावण महिन्यात हा उपाय नक्की करावा.

श्रद्धा सर्वात महत्त्वाची

या सर्व उपायांमध्ये श्रद्धा आणि विश्वास ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. भगवान शंकरांना दिखावा किंवा भव्य अर्पण अपेक्षित नसतं तर शुद्ध मन आणि प्रेम हवे असतं. जर तुम्ही खऱ्या भावनेने अर्पण केलं तर दोन थेंब रसदेखील तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात.

सोमवारी शिवलिंगावर कोणता रस अर्पण करावा?

आवळ्याचा रस अर्पण करावा.

शिवलिंगावर बर्फ अर्पण करण्याचा फायदा काय?

नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

मंगळदोष शमवण्यासाठी कोणता उपाय प्रभावी आहे?

शिवलिंगावर डाळिंबाचा रस अर्पण करावा.

डाळिंबाचा रस अर्पण करण्यामुळे कोणता धोका कमी होतो?

अपघात, अनिष्ट घटना आणि दुर्दैवापासून संरक्षण मिळते.

शिवपूजेत सर्वात महत्त्वाचे कोणते तत्त्व आहे?

श्रद्धा, भावना आणि शुद्ध मन हे सर्वात महत्त्वाचे आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT