Fashion trend, Monsoon care tips, Monsoon care
Fashion trend, Monsoon care tips, Monsoon care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालावे जाणून घ्या

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे आपल्याला कपड्यांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला अशाप्रकारचे कपडे घालायला हवे ज्यामुळे आपल्याला आरामदायी वाटू शकते.

हे देखील पहा -

आपल्याकडे अधिक प्रकारचे व अनेक रंगाचे कपडे असतात परंतु, पावसाळ्यात नेमके कोणत्या रंगाचे कपडे घालायला हवे हे आपल्याला कळत नाही. पावसाळ्यात कपडे सतत ओले असतात. त्यामुळे त्यांचा कुबट वास येऊ लागतो. कपडे ओले असल्यामुळे आपल्याला बाहेर जाताना कोणते कपडे परिधान करायला हवे असा प्रश्न सतत पडतो. आपण कपडे खरेदी करताना ते ऋतूमानानुसार करायला हवे. पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालायला हवे हे जाणून घेऊया.

१. पावसाळ्यात आपल्या साधेच कपडे परिधान करायला हवे. पावसाळ्यात हवामान दमट असते त्यासाठी आपल्या थंड लागणार नाही असे कपडे घ्या. तसेच किमान दिवसातून दोनदा बदला.

२. कपडे खरेदी करताना त्याचा रंग देखील महत्त्वाचा आहे. निळ्या रंगाबरोबर राखाडी व पांढऱ्या रंगाचे कपडे आपण घालू शकतो. यावेळी पिवळा, हिरवा या रंगाच्या कपड्यांचा शेड्स निवडा.

३. कापूस (Cotton), वॉइल, ऑर्गेन्झा, शिफॉन, जॉर्जेट किंवा लेसचे कापड पावसाळ्यासाठी (Monsoon) योग्य आहेत.फ्लोइंग स्टाइल्स मस्त लुक आणि फील देतात. तसेच ते लवकर सुकण्यास मदत करतात.

४. फिकट निळ्या, गुलाबी किंवा हलक्या हिरव्या रंगाच्या शॉर्ट चेक डेनिम स्कर्ट किंवा जीन्ससह कुर्ती आणि टॉप घाला. पावसाळ्यात कॉटन फॅब्रिकपासून बनवलेले कपडे घालावे. कारण कॉटन फॅब्रिक हवादार असते आणि घाम शोषून घेण्यास मदत करते.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT