वीरभद्रासनाचे फायदे कोणते जाणून घ्या  Saam Tv
लाईफस्टाईल

वीरभद्रासनाचे फायदे कोणते जाणून घ्या

वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव या आसनाला दिले गेले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव या आसनाला दिले गेले आहे.

हे आसन कसं करावं आणि त्याचे फायदे कोणते ते पाहुयात..

वीरभद्रासन कसे करावे? सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या. उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंशांवर वळवा. दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे. हात जमिनीस समांतर आहेत का हे तपासून पहा. त्यानंतर श्वास सोडत उजव्या गुडघ्यातून वाका आणि उजवीकडे वळून पहा. या आसनात स्थिर उभे रहा. नंतर हीच कृती डाव्या बाजूसही करा. यावेळी डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस तर उजवा पाय १५ अंश वळवा.

वीरभद्रासनाचे फायदे कोणते?

- हात, पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते.

- शरीर संतुलित राहते आणि काम करण्याची क्षमता वाढते.

- खांद्यांमधला ताण कमी होतो.

- स्नायूंना बळकटी मिळाल्याने शरीराला योग्य आकार प्राप्त होतो.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT