Government Employee : केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काहींना काही नवीन सोय करत असते. देशभरात अनेक कर्मचारी हे सरकारी नोकरी करत असतात. त्यात आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
आता सरकारी (Government) कर्मचाऱ्यांना पगार (Salary) होण्यापूर्वीच अॅडव्हान्स सॅलरी मिळणार आहे. राजस्थान सरकारने ही घोषणा केली आहे. अशोक गेहलोत सरकारने कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पदोन्नती वाढवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
१ जूनपासून ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे. याआधी देशात कोणत्याही राज्याने कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन दिले नाही. या व्यवस्थेअंतर्गत राज्य कर्मचारी त्यांच्या पगारातील अर्धा भाग आगाऊ घेऊ शकतील.
1. किती पैसे आगाऊ मिळतील ?
राजस्थान सरकारने म्हटले आहे की, या अंतर्गत एकावेळी जास्तीत जास्त 20,000 रुपये कर्मचाऱ्यांना मिळतील. सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी वित्त विभागाने नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीशी (Company) करार केला असून आगामी काळात आणखी काही बँका आणि वित्तीय संस्थांसोबत करार करु शकणार आहे.
जर कर्मचाऱ्याने कोणत्याही महिन्याच्या 21 तारखेपूर्वी त्याचा पगार काढणे निवडले तर, चालू महिन्याच्या पगारातून पगार कापला जाईल. याव्यतिरिक्त, कर्मचार्यांनी काढलेल्या आगाऊ पगारावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, परंतु सरकारशी संबंधित व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल.
2. कसा मिळेल ?
आगाऊ वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी, राजस्थान सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या SSO ID वापरून IFMS 3.0 सह स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्याच वेळी, वित्तीय संस्थांना संमती द्यावी लागेल.
राजस्थान सरकारी कर्मचारी त्यांच्या आर्थिक सेवा प्रदात्याच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन पोर्टलवर त्यांचे हमीपत्र सबमिट करू शकतात.
यानंतर कर्मचाऱ्यांना IFMS वेबसाइटवर परत जावे लागेल आणि वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे संमती द्यावी लागेल.
विशेष म्हणजे, राजस्थान सरकारची नवीन योजना काँग्रेस सरकारने राज्यातील जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करण्यासाठी एक पाऊल म्हणून पुढे आली आहे.
त्याचबरोबर निवडणुकीच्या दृष्टीने विशेष पाऊल म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.