Volvo XC40 Discontinued Saam Tv
लाईफस्टाईल

Volvo XC40 Petrol: भारतात Volvo XC40 पेट्रोल मॉडेलची विक्री बंद, काय आहे कारण?

Volvo XC40 Discontinued: भारतात Volvo XC40 पेट्रोल मॉडेलची विक्री बंद, काय आहे कारण?

Satish Kengar

Volvo XC40 Discontinued: 

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Volvo ने भारतात आपल्या XC40 पेट्रोल मॉडेलची विक्री बंद केली आहे. आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भारतीय बाजारपेठेसाठी फक्त पाच मॉडेल्स दिसत आहेत, ज्यात 4 SUV - XC40 Recharge, C40 Recharge, XC60 आणि XC90 आणि एक सेडान S90 यांचा समावेश आहे.

यातच XC40 भारतीय बाजारपेठेत तात्पुरते बंद केले आहे की कायमचे बंद केले आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. परंतु स्वीडिश कार निर्मात्याची 2030 पर्यंत ऑल-इलेक्ट्रिक ब्रँडमध्ये पोर्टफोलियो शिफ्ट करण्याची योजना लक्षात घेता, या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला ICE व्हेरिएंटमध्ये बाजारात पुन्हा एंट्री घेण्याची शक्यता कठीण दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Volvo XC40 पेट्रोल स्पेसिफिकेशन

भारतात, XC40 हे B4 अल्टिमेट व्हेरिएंट उपलब्ध होते, ज्यात माईल्ड-हायब्रिड पॉवरट्रेन ऑफर केली होती. जे 48V बॅटरीसह 2.0-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन होते. ही पॉवरट्रेन 197 bhp पॉवर आणि 300 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात ऑल-व्हील ड्राइव्ह सेटअप आहे, ज्याद्वारे सर्व चार व्हील्सला पॉवर मिळते.  (Latest Marathi News)

किती आहे किंमत?

जागतिक बाजारपेठेत Volvo XC40 ची स्पर्धा Mercedes-Benz GLA, BMW X1 आणि Audi Q3 शी आहे. या एसयूव्हीला गेल्या वर्षीच मिड-सायकल फेसलिफ्ट अपडेट देण्यात आले होते. XC40 ची एक्स-शोरूम किंमत 46.40 लाख रुपये होती.

Volvo XC40

लक्झरी इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीसह, व्होल्वो आता या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक मॉडेल, XC40 रिचार्ज भारतात विकते. या इलेक्ट्रिक SUV मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. ज्या 402 bhp पॉवर आणि 660 Nm टॉर्क जनरेट करतात. ही कार केवळ 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तासाचा वेग पकडू शकते. या EV मध्ये 79 kWh चा बॅटरी पॅक आहे, जो प्रति चार्ज 418 किमीची रेंज देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT