Friday Astro Tips saam tv
लाईफस्टाईल

Friday Astro Tips : घरी सोन्याच्या पावलांनी येईल लक्ष्मी; शुक्रवारी सकाळी उठताच करा ही ५ कामं

Shukrawar che Upay: हिंदू धर्मात शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणं हे विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भक्तीभावाने पूजा केल्याने केवळ आर्थिक समस्या दूर होतात. या शिवाय घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास देखील होतो.

Surabhi Jayashree Jagdish

देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवार हा सर्वात खास दिवस मानला जातो. शुक्रवारी सकाळी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो असं मानलं जातं. या दिवशी तुम्ही जे काही काम कराल त्यात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला पूर्ण यश मिळू शकतं. शुक्रवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करावी आणि मगच या गोष्टी कराव्यात.

आज शुक्रवार असून लक्ष्मीला खूश करण्यासाठी आजचा दिवस आणखी खास असणार आहे. कारण आज ६ जून रोजी निर्जला एकादशीचा शुभ योगायोग झाला आहे. या शुभ योगामध्ये जर तुम्ही खाली सांगितलेले उपाय केले तर तुम्हाला लवकरच इच्छित परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत.

लक्ष्मी वंदनाने करा सुरुवात

शुक्रवारच्या दिवशी अंथरुणावरून उठण्यापूर्वी दोन्ही हात जोडून तीन वेळा म्हणा:

"करगरे वसाते लक्ष्मी कर मी सरस्वती.

करमुळे तू गोविंदा प्रभाते करदर्शनम् || "

त्यानंतर ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा. यामुळे दिवसभर तुम्हाला चांगलं फळ मिळू शकेल. यावेळी शक्य असल्यास देवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावून देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

गंगाजल किंवा गुलाब पाण्याने अंघोळ करा

आंघोळीच्या पाण्यात गंगाजल, गुलाबजल किंवा चंदनाच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि आंघोळ करताना शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होत असल्याची भावना मनात ठेवा. यावेळी ॐ शुक्राय नम:चा जप करत रहा. ही क्रिया शुक्र ग्रहाचा समतोल साधते आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध आणि सौंदर्य वाढवतं.

घराच्या मुख्या दारावर दिवा लावा

आंघोळीनंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन दिवे लावा. यामध्ये एक देशी तूप आणि एक तिळाच्या तेलाचा दिवा असला पाहिजे. यामुळे घराच्या समृद्धी, शांती आणि सुरक्षिततेसाठी हे खूप फायदेशीर आहे. तुळशीजवळ दिवा लावताना जल अर्पण करा आणि ॐ तुळशीय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे घरात काहीही भांडणं असतील तर ती दूर करा.

पांढर्‍या गोष्टींचं दान करा

शुक्रवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर खीर, साखर, तांदूळ, दूध, पांढरे कपडे, अशा पांढऱ्या वस्तूंचं दान विशेष शुभ मानलं जातं. यावेळी एखाद्या गरीब स्त्रीला, मुलीला किंवा ब्राह्मणाला या वस्तू दान करा. त्याचप्रमाणे गायमातेला पोळी, तांदूळ किंवा गूळ खायला दिला पाहिजे.

घरात सुगंधित धूप लावा

शुक्रवारी सकाळी घरातील सर्व खोल्यांमध्ये चंदन, गुलाब, मोगरा या सुगंधी अगरबत्ती लावा. विशेषत: पूजास्थळ आणि घराची ईशान्य दिशा स्वच्छ करून त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेटचा भाव किती? वाचा लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

Canara Bank Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कॅनरा बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Milk Price Hike : महागाईचा भडका! म्हशीचे दूध लिटरमागे १० रुपयांनी वाढले

SCROLL FOR NEXT