Why Should You Not Keep a Gas Cylinder Near the Fridge? Saam TV
लाईफस्टाईल

Kitchen Safety Tips: किचनमध्ये गॅस सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? जाणून घ्या

Why Should You Not Keep a Gas Cylinder Near the Fridge?: सिलिंडर फ्रिजच्या जवळ का ठेवू नये? गॅस सिलिंडर आणि फ्रिज जवळ असण्यामुळे कोणता मोठा धोका निर्माण होऊ शकतो? जाणून घ्या.

Manasvi Choudhary

स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्वाचे ठिकाण मानले जाते. स्वयंपाकघरात गॅस सिलिंडर, मांडणी, पाण्यांचे भांडे, फ्रिज अशा सर्वच वस्तू असतात. परंतु या सर्व वस्तू योग्य जागी असणे महत्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी असणे महत्वाचे आहे.

अनेकदा जागेच्या अभावामुळे गॅस सिलिंडर हा फ्रिजच्या अगदी जवळ किंवा बाजूला आपण ठेवतो. मात्र हे चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार फ्रिजजवळ गॅस सिलिंडर ठेवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

सिलिंडर फ्रिजजवळ न ठेवण्याची प्रमुख कारणे

फ्रिज इलेक्ट्रॉनिक उपकरणांपैकी एक आहे. फ्रिजच्या मागील बाजूस कंप्रेसर आणि कॉइल्स असतात जे अन्न थंड करताना मोठी उष्णता बाहेर सोडतात. एलपीजी सिलिंडर हा अत्यंत दाबाने भरलेला ज्वलनशील गॅस असतो. सततच्या उष्णतेमुळे सिलिंडरचे तापमान वाढून आतील दाब वाढू शकतो, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका निर्माण होतो.

इलेक्ट्रिक स्पार्क आणि शॉर्ट सर्किटचा धोका

फ्रिजच्या ऑटोमॅटिक स्विचिंग किंवा वायरिंगमध्ये कधीकधी स्पार्किंग होण्याची शक्यता असते. जर गॅस सिलिंडरमध्ये गळती ( असेल आणि फ्रिज उष्णतेच्या संपर्कात आली, तर आग लागू शकते.

वेंटिलेशनची समस्या

फ्रिजच्या बाजूला सिलिंडर ठेवल्याने हवा खेळती राहत नाही. गॅस लीक झाल्यास साचून राहतो त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता वाढू शकते.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसााठी योग्य सल्ला घ्या..

गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाडिक पॅटर्न पडला मागे

Shocking: २ महिन्यांपूर्वी लग्न, दिवाळीनिमित्त घरी आले; घरात आढळले शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT