kids health tips, stomach pain, child care  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kids Health Tips : पोटदुखीमुळे मुलं झाली हैराण ? हा आजार आहे की, जंताचा वाढलेला आणखी कोणता नवा प्रकार? जाणून घ्या

मुलांचे पोट दुखतंय त्यासाठी काय कराल ?

कोमल दामुद्रे

मुंबई : मुलं लहान असेल तर आपल्याला त्याच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागते. मुलं दिवसभरात कोणते पदार्थ खातात, ते त्याच्या शरीरासाठी चांगले असतात की, वाईट हे देखील आपल्याला पहावे लागते.

हे देखील पहा -

मुलांनी सतत गोडाचे पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्यानंतर त्याचे पोट दुखत असते. त्यामुळे मुलांच्या शरीरिक व मानसिक वाढीवर परिणाम होतो. आपल्याला वाटते सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे मुलांना इनफेक्शन झाले असावे म्हणून आपण अशावेळी डॉक्टारांचा सल्ला घेतो. परंतु, पोट दुखीचे कारण हे वाढलेले जंत असतात. सतत गोड खाल्ल्यामुळे हा त्रास वाढू शकतो. यामुळे मुलांच्या पोटाला किंवा पूर्ण अंगाला सतत खाज येऊ शकते. मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास पोटदुखी थांबू शकते हे जाणून घेऊया.

१. मुलांच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश करा. गरम पाण्याच कच्च्या पपईचा रस व मध घालून मुलांना तो प्यायला द्या. त्यामुळे त्याचे पोट साफ होण्यास मदत होईल व जंताचा नाश होईल.

२. मुलांना फळे खायला अधिक आवडतात त्यासाठी त्याच्या आहारात अननसाचा समावेश करा. अननस खाल्ल्याने पोट साफ होते तसेच पचनसंस्था देखील सुधारते. रिकाम्या पोटी अननसाचा रस पिल्याने पोट साफ होण्यास मदत होईल.

३. डाळिंब हे कोणत्याही आजारांवर गुणकारी आहे. डाळिंबासोबतच त्याच्या सालींचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. डाळिंबाची साल पाण्यात उकळवून रात्रभर ठेवा. सकाळी गाळून याचे काही थेंब मुलांना पाजल्याने पोट साफ होण्यास मदत होईल.

४. हळद ही आपल्या स्वयंपाकघरात नेहमी आढळते. मुलांचे (Child) पोट दुख असेल तर पोटातील जंत मारण्यासाठी कोमट पाण्यात हळदी घालून ते पाणी (Water) मुलांना पिण्यास द्या. तसेच ताकात किंवा दुधात हळद घालून ते देखील दिल्याने फायदा होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांनो इथे लक्ष द्या! रेल्वेच्या कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक? पहा वेळापत्रक

Maharashtra Live News Update: धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसने घेतला पेट

Bigg Boss 19: झिशान कादरीने तान्या मित्तलला दिला धोका; बिग बॉसच्या घरात नेमंक चाललंय तरी काय?

Pune : महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड होणार, बोनससह सानुग्रह अनुदानात वाढ

Chanakya Niti: खुश राहण्यासाठी 'या' सिक्रेट टिप्स करा फॉलो, चाणक्यांचा खास सल्ला

SCROLL FOR NEXT