Kiara Advani Saam TV
लाईफस्टाईल

Kiara Advani : कियारा अंघोळीसाठी कोणतं बॉडी जेल वापरते? वाचा आणि तिच्यासारखं सुंदर व्हा

Ruchika Jadhav

बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रत्येकाच्या फेवरेट असतात. अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी अंघोळ आणि केसांसाठी कोणते प्रोडक्ट वापरतात या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. अशात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच आपल्याला अंघोळी बद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

अंघोळीचा अनुभव सांगतानाचा तिचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री एका शोमध्ये आली आहे. शो संपल्यावर ती पत्रकारांशी संवाद साधत आहे. यावेळी ती आपल्या अंघोळीवर बोलते. यात ती दर्जेदार प्रोडक्टमध्ये ती शॉवर जेल आणि सॉइल बाथ बद्दल बोलत आहे.

कियाराने यात म्हटलं आहे की, मी जेव्हा नवीन घर घेतलं होतं. तेव्हा मला एक सुंदर बाथ टप आणि आणि बाथ सॉइल घ्यायचं होतं. याची खरेदी करणे हा माझा उत्तम अनुभव होता. अंघोळकरताना गरम पाण्याचा शॉवर, बाथ जेल आणि बाथ सॉइल या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत.

अंघोळीसाठी गरम पाणी वापरू नये असं अनेक व्यक्ती सांगतात. गरम पाणी आपल्या त्वचेसाठी चांगलं देखील नसतं. त्यामुळे अंघोळीला पाणी घेताना ते कोमट असावं. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचं बॉडी जेल किंवा बॉडि वॉश आणि बाथ सॉइल वापरावे हे तुमच्या स्किन टाइपवर ठरते. त्यामुळे स्किन टाइप पाहूनच वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्या.

असे निवडा योग्य शॉवर जेल

डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर आंचल पंथ यांनी यावर म्हटलंय की, तुम्ही तुमच्या गरजेनुसार शॉवर जेल वापरले पाहिजे. ड्राय स्किनसाठी क्रीमी बॉडी वॉश वापरा. तर इनग्रोन हेयरसाठी सॅलिसिलिक अॅसिड आणि ग्लाइकोलिक अॅसिड बॉडी वॉश वापरावे. शरीरावर अॅक्ने असतील तर तेव्हा देखील तुम्ही इनग्रोन हेयरसाठी सॅलिसिलिक अॅसिडचा वापर करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT