how to invest your money in Marathi, Investment Plans in Marathi
how to invest your money in Marathi, Investment Plans in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

आर्थिक नियोजन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपले उद्याचे भवित्यव्य सुरक्षित करण्यासाठी आपण आज कमावत असतो. त्यातही आपल्यापैकी बरेचजण गुंतवणूक करतात पण, गुंतवूणक केल्यानंतरही अनेकदा इतर खर्चांमुळे आपण केलेली गुंतवणूक विस्कळीत होते. (Investment Plans in Marathi)

हे देखील पहा -

नियोजन न करता गुंतवणूक केल्यास आपल्या हाती अपयश येते. गुंतवूणक करताना आपण नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास आपल्याला नुकसान सहन करावे लागणार नाही. त्यामुळे प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी आपण स्वतंत्रपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे काही नियम (Rules) आहेत जे नेहमी आपण लक्षात ठेवले पाहिजेत.

अशी करा गुंतवणूक

१. बचतीसह खर्च करण्यास सुरुवात करा -

आपल्यापैकी बरेच लोक घरखर्च पूर्ण झाल्यानंतर पैसे (Money) गुंतवतात पण, आपल्या महिन्याची कमाईचे पैसे येतील त्या दिवशी सर्वात आधी कमाईचा काही भाग बचतीसाठी काढून ठेवायला हवा. उरलेल्या पैशातून घरखर्च करायला हवा. आपल्या कमाईच्या सुरुवातीपासूनच आपण बचत करायला हवी.

२. आर्थिक सुरक्षा -

गुंतवणुकीची पहिली पायरी स्वतःचे आयुष्य सुरक्षित बनवण्यापासून सुरू होते. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १५ टक्के तरी आपण लाइफ कव्हर सारख्या गुंतवणुकीत केले पाहिजे. ज्यामुळे आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला (Family) कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

३. आपत्कालीन निधी

आपण गुंतवणुक करताना आपल्याकडे आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे. आपत्कालीन निधीच्या मदतीने जीवनात अचानक आलेल्या आर्थिक संकटाचा सामना आपल्याला करता येईल. आपत्कालीन निधीचा सर्वात मोठा फायदा आपली इतर गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यास होतो. आपत्कालीन निधी किमान सहा महिन्यांच्या खर्चाएवढी असावी.

४. सेवानिवृत्ती नियोजन

तारुण्यात वृद्धापकाळाची योजना आखली तर निवृत्तीचे वय आनंदाने जाते. महागाईचा दर आणि आपल्या पुढील गरजा लक्षात घेऊन आपण पेन्शन योजनेत गुंतवणूक करावी. आजच्या उत्पन्नाच्या तुलनेत आपण पुढील काळासाठी किमान २५ टक्के बचत केली पाहिजे.

अशाप्रकारे आपण आपल्या कमाईची गुंतवणूक योग्य ठिकाणी करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

SCROLL FOR NEXT