फ्रीजच्या आतील पिवळे डाग हटवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

फ्रीजच्या आतील पिवळे डाग हटवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
How to clean fridge
How to clean fridgeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फ्रीज हा आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यात आपण सर्वजण अन्नपदार्थ साठवून ठेवू शकतो. फ्रीजची नियमित साफसफाई न केल्यास त्यांचा वास येऊ लागतो. कधीकधी फ्रीज साफ करुनही त्यांच्या आतील पिवळे डाग नाहीसे होत नाही.

हे देखील पहा -

फ्रीजची नियमित साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. यात फळे, भाजीपाला (Vegetable) अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे त्याचे डाग सहज पडू शकतात आणि त्या साफ करण्यासाठी आपल्याला खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. अशा वेळी आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो परंतु, आपला हा निष्काळजीपणा आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आणू शकते. अशावेळी फ्रीजमधून कोणत्याही प्रकारचा वास येत असेल तर तो स्वच्छ करा. फ्रीजमध्ये असणाऱ्या हट्टी डागांना कसे काढता येईल ते पाहूया.

फ्रीज कसे स्वच्छ करावे

१. फ्रीज साफ करण्यासाठी सर्व प्रथम २ तासाआधी फ्रीज डीफ्रॉस्ट करा.

२. फ्रीज साफ करण्यापूर्वी तो पूर्णपणे रिकामा करा.

How to clean fridge
हळदी तुझा रंग गहिरा का?

३. त्यानंतर कोमट पाणी (Water) आणि डिटर्जंटचे द्रावण तयार करा.

४. स्पंज आणि या द्रवाच्या मदतीने फ्रीज आणि रॅक घासून स्वच्छ (Clean) करा व नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.

५. यानंतर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घ्या आणि घरगुती क्लिनर तयार करा. व फ्रीजमध्ये जिथे पिवळे डाग असतील तिथे स्प्रे करा.

६. तसेच डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा आणि ब्रशच्या मदतीने डाग घासा याच्या मदतीने, पिवळे डाग त्वरित साफ होण्यास मदत होईल.

अशाप्रकारे आपण फ्रीजच्या आतील पिवळे डाग हटवू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com