Jio Recharge Plans Saam Tv
लाईफस्टाईल

Jio युजर्ससाठी गुड न्यूज! दररोज 2GB डेटा, फ्री OTT आणि 5G स्पीड मिळणार

साम टिव्ही ब्युरो

Jio Recharge Plans :

रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी ग्राहक संख्या असलेली टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडून अनेक प्रीपेड प्लान ऑफर केले जात आहेत. कंपनीने काही काळासाठी OTT सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करणे बंद केले होते.

परंतु पुन्हा एकदा OTT सेवांचे फायदे अनेक जिओ प्लॅनसह उपलब्ध होत आहेत. यातच आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या Best Value Offer देणाऱ्या प्लानची माहिती सांगणार आहोत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जर तुम्ही दररोज डेटा, एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह Jio प्रीपेड प्लान घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अशा प्लानमध्ये मोफत OTT सेवांचाही आनंद घेऊ शकता. आम्ही ज्या प्लानबद्दल बोलत आहोत तो 84 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि रिचार्जिंगच्या बाबतीत अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ देखील देतो. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... (Latest Marathi News)

जिओच्या व्हॅल्यू ओटीटी प्लानमध्ये मिळणार हे फायदे

रिलायन्स जिओच्या व्हॅल्यू प्लानची ​​किंमत 909 रुपये आहे आणि याची वैधता 84 दिवस आहे. या प्लानमध्ये रिचार्ज केल्यास यूजर्सला दररोज 2GB डेटा मिळतो. अशा प्रकारे प्लॅनमध्ये एकूण 168GB डेटा मिळतो. हा दैनंदिन डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे.

प्लानमध्ये दररोज 100 एसएमएस आणि Jio अॅप्स (JioTV, JioCinema आणि JioCloud) मध्ये अॅक्सेस करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लानसोबत Sony LIV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

अनलिमिटेड 5G डेटा

जर तुम्ही अशा भागात रहात असाल जिथे Jio ची 5G सेवा सुरू झाली आहे आणि तुमच्याकडे 5G स्मार्टफोन आहे, तर तुम्ही या प्लानसह रिचार्ज केल्यास तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दैनंदिन डेटाची काळजी करण्याची गरज नाही. कंपनी 239 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या सर्व प्लानसह अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT