Jaya Kishori Love Quotes Saam Tv
लाईफस्टाईल

Jaya Kishori Love Quotes : प्रेमाचं नातं टिकवण्यासाठी जया किशोरीने दिले प्रेमीयुगुलांसाठी सल्ले, वाचा सविस्तर

Love Quotes : प्रेमाची व्याख्या सांगताना जया किशोरी म्हणाल्या की, प्रियकरला सोडता येते, पण त्याचे शब्द विसरता येत नाही. श्री कृष्णापासून वेगळ्या झाल्यानंतर गोपींनीही सांगितले होते की कान्हाला सोडू शकतो पण कान्हाचे शब्द विसरता येत नाही.

Shraddha Thik

Jaya Kishori :

प्रेमाची व्याख्या सांगताना जया किशोरी म्हणाल्या की, प्रियकरला सोडता येते, पण त्याचे शब्द विसरता येत नाही. श्री कृष्णापासून वेगळ्या झाल्यानंतर गोपींनीही सांगितले होते की कान्हाला सोडू शकतो पण कान्हाचे शब्द विसरता येत नाही.

कान्हा आजूबाजूला नाही हे सहन करू पण त्याच्याबद्दल बोलू नका, हे कसे शक्य आहे. त्यावरच आम्ही जिवंत आहोत, असे गोपांचा उदाहरण देत जया किशोरी प्रेमात फसवणूक (Fraud) झालेल्या प्रेमीयुगुलांसाठी काही सल्ले दिले आहेत ते जाणून घेऊयात.

प्रेमात तुटलेल्या आणि फसवलेल्या लोकांनी कोणाचा आधार घ्यावा?

जया किशोरी म्हणाल्या, अशा लोकांनी जी व्यक्ती कधीही बदलत नाही तिचा आधार घ्यावा. पण त्याचवेळी प्रश्न पडतो की जग की देव या दोघांपैकी कोणाचा आधार घ्यावा? त्यासाठी लोकांनी जगाचा आश्रय घेऊ नका आणि देवाचा आश्रय घ्यावा, कारण देव कधीही बदलत नाही.

प्रेम का संपते?

जया किशोरी म्हणाल्या की, प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा त्यात कशाचाही स्वार्थ नसावा, त्यासाठी कोणतेही कारण नसावे आणि कोणत्याही गोष्टींचा अर्थ नसावा. दोन व्यक्तींमध्ये काही कारणास्तव प्रेम (Love) असेल, त्या प्रेमातला अर्थ हरवला तर प्रेमही संकटात येते. अशा नात्यात स्वार्थ पाहिला जातो आणि काम पूर्ण होईपर्यंतच प्रेम असते.

सुंदरतेच्या मागे धावू नका?

देवाने सुंदरतेच्या मागे धावू नका असा धडा दिला कारण राक्षस वासनांध होऊन मोहिनी रूपाच्या मागे लागले आणि अमृत विसरले. जो केवळ सौंदर्याचा पाठलाग करतो तो अमृत सोडतो. अमृत म्हणजे गुण, म्हणून गुणांच्या पाहून प्रेम करावे कारण सौंदर्य फार काळ टिकत नाही. असे जया किशोरी सांगतात.

बॉयफ्रेंड किंवा प्रेयसीसोबत कसे वागावे?

जया किशोरी म्हणाल्या की, आपल्या प्रियजनांशी नेहमी विचारपूर्वक बोलले पाहिजे, कारण जर तुम्ही इतर व्यक्तींसोबत विचार करून बोलत असाल तर प्रियजनांशी का नाही? असा विचार करा आणि प्रियकरासोबत बोला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : अमाल मलिकने तान्या मित्तलला रडवलं; प्रणित मोरेनंतर 'हा' सदस्य बनवा नवा कॅप्टन, पाहा VIDEO

Recharge Update: लाखो यूजर्सना मोठा धक्का! 'या' कंपनीने एकाच वेळी अनेक प्लॅनची वैधता केली कमी

Winter Health Tips: हिवाळ्यात रात्री हे पदार्थ टाळा; अन्यथा सर्दी-खोकल्याने व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

Gulmarg Snowfall : निसर्गाचा अद्भुत नजारा, गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी पर्यटनासाठी नंदनवन खुलले! | VIDEO

SCROLL FOR NEXT