Murud-Janjira Fort News: Janjira Fort Closed on 26 May 2024 for the Rainy Season in Maharashtra Saam TV
लाईफस्टाईल

Murud-Janjira Fort News: पर्यटकांसाठी महत्वाची बातमी; 26 मेपासून जंजिरा किल्ला बंद

Maharashtra's Janjira Fort Closed: पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. याच कारणामुळे आता २६ मेपासून जंजिरा किल्ला बंद असणार आहे.

Ruchika Jadhav

मे महिना अजून संपलेला नाही त्यामुळे अजूनही अनेक पर्यटकप्रेमी बाहेर फिरत आहेत. विविध ठिकाणी भेट देत ऐतिहासीक वास्तूंची माहिती घेत आहेत. राज्यात गड किल्ल्यांना भेट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशात याच पर्यटकांसाठी महत्वाती माहिती समोर आलीये. जंजिरा किंल्ला २६ मेपासून पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. अशात साडेतीनशे वर्षापूर्वी समुद्रात बांधलेला जंजिरा किल्ला कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गापैकी एक आहे.

समुद्रातून रस्ता असल्याने दरवर्षी अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पावसाळ्यात किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. याच कारणामुळे आता २६ मेपासून जंजिरा किल्ला बंद असणार आहे.

पावसाळ्यात किल्ला पाहण्यासाठी मार्ग

किल्ला बंद आहे मात्र तरीही पावसाळ्यात हा किल्ला पाहण्याची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी एक पर्याय आहे. तुम्ही पावसाळ्यात खोरा जेटी अथवा राजपुरी जेटीवरून बाहेरून किल्ला पाहू शकता. मात्र तुम्हाला समुद्रात जाता येणार नाहीये. त्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

जंजिरामुळे अनेकांना रोजगार

जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. समुद्रातून जायचे असल्याने येथे अनेक छोट्या व्यवसायिकांसाठी उत्पन्नाची मोठी संधी निर्माण झाली आहे.

किल्ल्यापर्यंत कसं जायचं?

जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने तुम्ही प्रवास करू शकता. येथून समुद्रकिनाऱ्यावरील नयनरम्य प्रवास करत जंजिरा गाठता येईल. पुण्याहून जायचे असल्यास तेथून हा किल्ला १८० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गाने जाता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शरद पवारांच्या भेटीला

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT