Jamun Leaves For Diabetes Canva
लाईफस्टाईल

Jamun Leaves For Diabetes : मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळाच्या पानांचा होतो उपयोग, साखरेचे वाढलेले प्रमाण असे करा कमी !

जांभळाच्या पानांचा आपल्याला कसा फायदा होईल हे जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Jamun Leaves Benefits : आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्यातच भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जात आहे.

भारतातील ७५ टक्क्यांहून अधिक रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रणात नसल्याचे अनेक वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

मधुमेहाच्या रुग्णांच्या साखरेची पातळी अनियंत्रित झाल्यास हृदयविकार, किडनी आणि फुफ्फुसांना धोका निर्माण होऊ शकतो.अशा परिस्थितीत जांभळाचे सेवन प्रभावी ठरु शकते. अशावेळी जांभळासोबत त्याच्या पानांचा देखील आपल्याला बराच फायदा होतो. त्याची पाने देखील मधुमेह कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

जांभळाच्या पानांचा होणारा उपयोग -

जांभूळ हे एक हंगामी फळ आहे ज्याच्या तुरट व गोड चवीमुळे ते सर्वांना आवडते. जांभळाच्या फळासोबत त्याच्या पानांचा देखील उपयोग होतो. जांभळाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती आहे मधुमेहाच्या रुग्णांना या फळाचा सर्वाधिक फायदा होतो.

या फळासोबत त्याची पानेही खूप गुणकारी आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण त्याची पाने देखील वापरू शकतो. याच्या पानातील तुरट आणि अम्लीय गुणधर्म शरीरातील अनेक समस्या दूर करण्यात प्रभावी आहेत. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश आहे, जे शरीरातील अनेक रोग बरे करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचा फायगा कसा होतो हे जाणून घ्या.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते -

जांभळाच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. जांभळाच्या पानांमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ याच्या पानाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

जांभळाच्या पानांपासून तयार केलेला चहा मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरतो. संशोधनानुसार, जांभळाच्या पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.

जांभळाच्या पानांचा चहा कसा बनवायचा

Jamun Leave Tea

१ कप पाणी (Water) घ्या. एका पातेल्यात पाणी टाकून चांगले उकळा. यानंतर धुऊन त्यात काही जांभळाची पाने टाका. जर आपल्याकडे जांभळाच्या पानांची पावडर असेल तर आपण १ चमचे पाणी घालून पावडर उकळवा. पाणी चांगले उकळले की ते गाळून घ्या. याचत मध किंवा काही थेंब लिंबाचा रस मिसळून प्या. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) ठरू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT