Health risks of keeping laptop on lap for long hours saam tv
लाईफस्टाईल

Work from home health risks: लॅपटॉपची उष्णता शरीरासाठी घातक? तज्ज्ञांनी दिला वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना महत्त्वाचा इशारा

Health risks of keeping laptop on lap for long hours: तासन्‌तास मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करताय? तज्ज्ञांच्या मते यामुळे त्वचा, मणका, स्नायू आणि मनगटांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. लॅपटॉपच्या उष्णतेमुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. सुरक्षित पद्धतीने काम कसं करावं जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडतात. यासाठी बरेच जण तासन्‌तास मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करताना दिसतात. सुरुवातीला ही पद्धत खूप आरामदायक वाटत असली तरी त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विशेषतः सतत चुकीच्या पद्धतीने लॅपटॉप वापरल्यास त्वचा, स्नायू आणि शरीराच्या इतर भागांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

दिल्लीतील पीएसआरआय रुग्णालयाचे फिजिओथेरपी विभागप्रमुख लक्ष्य भक्तयानी यांनी सांगितलं की, मांडीवर लॅपटॉप ठेवणं थेट जीवघेणं नसलं तरी दीर्घकाळ ही सवय कायम राहिल्यास अनेक आरोग्य सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काम करताना योग्य पोश्चर आणि सुरक्षित पद्धतीचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

त्वचेवर होतो परिणाम

त्वचेवर होणारा परिणाम हा सर्वात मोठा धोका मानला जातो. लॅपटॉपमधून सतत बाहेर पडणारी उष्णता त्वचेच्या थेट संपर्कात आल्याने त्वचेवर लालसरपणा, जळजळ आणि खाज येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये ‘टोस्टेड स्किन सिंड्रोम’ नावाची समस्या देखील दिसून येते. सतत उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने त्वचेवर जाळीसारखे डाग पडतात आणि त्वचा खराब होण्याचा धोका वाढतो.

मणक्याशी संबंधित त्रास

याशिवाय मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने शरीराची बसण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. स्क्रीन नीट पाहण्यासाठी अनेकांना मान खाली झुकवून बसावं लागतं. दीर्घकाळ अशा स्थितीत राहिल्यास मान, खांदे आणि पाठीत वेदना सुरू होतात. स्नायूंमध्ये ताण निर्माण होऊन पुढे जाऊन मणक्याशी संबंधित त्रास वाढू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रिप्रोडक्शन सिस्टिमवर परिणाम

पुरुषांच्या रिप्रोडक्शन सिस्टिमवर लॅपटॉपच्या उष्णतेचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा अनेक संशोधनांमध्ये समोर आलीये. काही अभ्यासांनुसार, सतत जास्त उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. या विषयावर अजून सखोल संशोधन सुरू असले तरी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात.

मनगटात होतात वेदना

लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताना हात आणि मनगटांची स्थितीही योग्य नसते. चुकीच्या अँगलमध्ये दीर्घकाळ टायपिंग केल्यामुळे मनगटात वेदना, ताण आणि हातात बधिरपणा जाणवू शकतो. त्यामुळे भविष्यात हातांच्या स्नायूंवर ताण वाढण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोलापूर हादरलं! विवाहितेनं दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं

केस गळती कायमची थांबेल! तांदूळ आणि मेथीचा घरगुती हेअर स्प्रे केसांना देईल मजबूती

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणात आरोपी भीमरावविरोधात आरोप निश्चित

Accident News : भयंकर! १४ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता

Manoj Jarange Patil: उष्माघातानं जीव गेला तर जाऊ दे! सरकार जबाबदार असेन; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT