Diet Mistakes google
लाईफस्टाईल

Diet Mistakes : रोज सकाळी उपाशी पोटी चिया सीड्स खाणं आत्ताच टाळा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Chia Seeds Side Effects : चिया सिड्स उपाशीपोटी खाल्ल्यास पचनशक्ती मंदावू शकते व रक्तदाब कमी होऊ शकतो. तज्ज्ञ सांगतात योग्य प्रमाण, सेवनाची वेळ आणि आरोग्यदायी फायदे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी विविध पदार्थांचे सेवन करु शकतात. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे डाएट फॉलो करत असतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांच्या डाएटचे योग्य नियोजन ते करतात. त्यातच शरीराला सगळ्यात आवश्यक असते ते म्हणजे पाणी. लोक पाण्यामध्ये चीया सीड्स टाकून पिणं जास्त पसंत करतात. मात्र चिया सीड्स शरीरासाठी योग्य आहेत का? आणि त्याचे सेवन कधी केलं पाहिजे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

पचनाच्या समस्या

जर एखाद्याची पचनशक्ती योग्य रित्या काम करत नसेल तर, त्यांना आम्ल पित्त किंवा पोटात अ‍ॅसिडीटी झालेली असू शकते. अशावेळेस चिया सिड्स खाणं टाळावं. कारण त्याने तुमची पचनशक्ती अधिक प्रमाणात मंदावते.

रक्तदाबाचे औषध

जे लोक रक्तदाब नियंत्रित ठेवण्याच्या गोळ्या औषधं घेत असाल तर चिया सिड्सचे सेवन करु नये. कारण अल्फा-लिनोलेनिक नामक घटक असतात. याने तुमचे ब्लड प्रेशर लेवल कमी होऊ शकतो. त्याने तुम्हाला अशक्तपणा आणि चक्कर येण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, चिया सिड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडचे स्त्रोत असतात. त्याचे सेवन केल्याने ह्दयरोग आणि जळजळ कमी करता येते. अशा परिस्थितीत चिया बियाणे हा एक चांगला पर्याय बनतो. परंतु चिया सिड्स मर्यादित प्रमाणात सेवन करावे. चिया सिड्स पाण्यात भिजवा आणि नंतर ते सेवन करा. कधीही १ ते २ चमच्यापेक्षा जास्त चिया सिड्स खाऊ नये. शिवाय ते कच्चे खाणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT