Childhood cancer contagious myth truth SAAM TV
लाईफस्टाईल

Child cancer myths: लहान मुलांमधील कॅन्सर संसर्गजन्य असतो? पालक करतायत ही गंभीर चूक, आधी सत्य जाणून घ्या

Childhood cancer contagious myth truth: अनेक पालकांमध्ये असा गैरसमज आहे की, मुलांमधील कॅन्सर संसर्गजन्य असतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा पूर्णपणे चुकीचा विश्वास आहे.

Surabhi Jayashree Jagdish

जेव्हा एखाद्या मुलाला कॅन्सरचं निदान होतं तेव्हा हा आजार केवळ त्यांच्या शरीरावर परिणाम करत नाही तर तो संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवून आणतो. पालकांसाठी, रुग्णालयाच्या भेटींमध्ये लागणारा वेळ मोजला जातो. यामध्ये ब्लड तपासणी कोणत्याही चाचणीपेक्षा अधिक महत्त्वाची असते. लहान मुलांच्या कॅन्सरबाबतही अनेक गैरसमज असतात.

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बालरोग ऑन्कोलॉजीस्ट, डॉ. चिंतन व्यास म्हणाले की, बालपणातील कॅन्सरच्या गैरसमजांना वेळेत समजून घेणं गरजेचं आहे. हे गैरसमज काय असतात ते पाहूयात.

गैरसमज - लहान मुलांमधील कॅन्सर संसर्गजन्य असतो

गैरसमजांपैकी एक म्हणजे कॅन्सर एका मुलापासून दुसऱ्या मुलामध्ये पसरू शकतो असं लोकांना वाटतं. मात्र बालपणातील कॅन्सर संसर्गजन्य नाही. हा स्पर्श, खेळ, खेळणी शेअर करणं, अन्न किंवा खेळ याद्वारे पसरत नाही. तरीही, अनेक कुटुंबांना असं पाहायला मिळतं की, मित्र हळूहळू स्वतःपासून दूर जातात. यामध्ये वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण पाठवण्यापूर्वी पालक कचरतात.

गैरसमज - यामध्ये पूर्णपणे पालकांची चूक आहे

बऱ्याच पालकांमध्ये अपराधीपणाची भावना असते. प्रश्न त्यांच्या मनात रेंगाळतात की, त्यांच्या मुलाने काही चुकीचं खालंले का? आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं का? वर्षांपूर्वी काहीतरी चुकीचं घडलं होतं का? पण वैद्यकीय शास्त्र स्पष्ट की, बहुतेक बालपणातील कॅन्सर पेशींच्या विकासादरम्यान होणाऱ्या अनुवांशिक बदलांमुळे होतात. त्याला ते पालकत्व, आहार, संसर्ग संबंध नसतो.

गैरसमज - बालपणाची कॅन्सर हा घातक असतो

बालपणातील कर्करोग जवळजवळ नेहमीच घातक असतो. ही धारणा सर्वात भीतीदायक आहे. पण खरं तर वैद्यकीय शास्त्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांमुळे, बालपणातील कॅन्सरच्या अनेक प्रकारांसाठी जगण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे.

गैरसमज - उपचार नेहमीच असह्य वेदना देतात

बरेच लोकांचा असा विश्वास आहे की, कॅन्सरच्या उपचारांमुळे मुलाला सतत वेदना होतात. खरं तर, आधुनिक उपचार पद्धती वेदना व्यवस्थापन आणि जीवनाच्या गुणवत्तेवर विशेष भर देतात. डॉक्टर, नर्स आणि समुपदेशकांची एक टीम मुलाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या देखील सुरक्षित वाटेल याची खात्री करण्यासाठी काम करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT