IRCTC Ayodhya Varanasi Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

Ayodhya Varanasi Tour Package: IRCTC चा नवा टूर पॅकेज! अयोध्या, वाराणसीसह फिरता येणार ८ धार्मिक स्थळांना; बुकिंग खर्च पाहा

Ayodhya Varanasi IRCTC Tour Plan Details in Marathi: आयआरसीटीसी देशातील आणि परदेशातील विविध पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांसाठी टूर पॅकेजचे आणत असते. अशातच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन तर्फे ८ शहरातून धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेतर्फे भन्नाट टूर प्लान आणला आहे.

कोमल दामुद्रे

Summer IRCTC Tour Package:

उन्हाळा सुरु झाला की, आपल्यापैकी अनेकांना फिरायचे असते. त्यासाठी आपण धार्मिक आणि पर्यटनस्थळे शोधत असते. जर तुम्हालाही फॅमिली किंवा मित्रांसोबत फिरायचे असेल तर तुम्ही आयआरसीटीसीचा या टूर प्लानला भेट देऊ शकता.

आयआरसीटीसी (IRCTC) देशातील आणि परदेशातील विविध पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांसाठी टूर (Tour) पॅकेजचे आणत असते. अशातच भारत गौरव टुरिस्ट ट्रेन तर्फे ८ शहरातून धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेतर्फे भन्नाट टूर प्लान आणला आहे.

या टूर प्लानमध्ये कोलकाता गंगा सागर गंगा सागर यात्रा बैद्यनाथ, गया, पुरी, कोणार्क, गंगासागर, कोलकाता, वाराणसी आणि अयोध्या या ठिकाणी फिरता येणार आहे. हा प्रवास (Travel) ९ रात्री आणि १० दिवसांचा असणार आहे. हा टूर प्लान २५ एप्रिलला सुरु होणार असून ४ मे पर्यंत असेल.

1. या धार्मिक स्थळांना देता येईल भेट

या टूर पॅकेजमध्ये भाविकांना पर्यटक विष्णुपद मंदिर आणि गया, बिहारमधील स्थानिक मंदिरे, बैद्यनाथ मंदिर, जसदीह, जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क मंदिर, पुरी स्थानिक मंदिर, गंगा सागर, काली मंदिर कोलकाता, काशी विश्वनाथ मंदिर आणि वाराणसीमधील इतर प्रमुख मंदिरांना भेट देऊ शकतात. तसेचा रामजन्मभूमी, हनुमान गढी आणि अयोध्येतील विविध मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे.

2. प्रवास कसा असेल?

या प्रवासात भारत गौरव ट्रेनमधील एकूण बर्थची संख्या ७६७ आहे. ज्यामध्ये 02 AC च्या एकूण ४९ जागा, 03 AC च्या एकूण ७० जागा आणि स्लीपरच्या एकूण ६४८ जागा आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी, आग्रा कँट, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई, ओराई, कानपूर, लखनौ, अयोध्या कँट आणि काशी किंवा बनारस येथे ही ट्रेन थांबेल. या पॅकेजमध्ये 02 AC, 03 AC आणि स्लीपर क्लासचा प्रवास, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, एसी/नॉन एसी बसमधून प्रवास करता येईल.

3. बुकिंग खर्च किती?

  • या प्रवासासाठी स्लीपर क्लासमध्ये एकत्र राहणाऱ्या प्रति व्यक्तीला १७,५०० रुपये मोजावे लागणार आहे. तर लहान मुलांसाठी १६४०० रुपये भरावे लागतील.

  • ३ एसीसाठी प्रति व्यक्तीला २८,३०० रुपये मोजावे लागणार आहे. तर लहान मुलांसाठी २७००० रुपये भरावे लागणार आहे.

  • तर 2AC मध्ये प्रति व्यक्तीला ३७,२०० रुपये मोजावे लागणार आहे. तर लहान मुलांना ३५,६०० रुपये भरावी लागतील.

  • या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना एसी रुम, ट्रेन प्रवास, नॉन एसी, हॉटेलमध्ये राहण्याची, मल्टी शेअर आणि नॉन-एसीची सुविधा मिळणार आहे.

4. बुकिंग कसे कराल?

पॅकेज बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT